सॅमसंगने आपला नवीन फोन गॅलेक्सी J मॅक्स लाँच केला. ह्या स्मार्टफोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे ह्यात ७ इंचाची डिस्प्ले देण्यात आली आहे. कंपनीने भारतीय बाजारात ह्या फोनची किंमत १३,४०० रुपये ठेवली आहे. हा फोन काळा आणि सोनेरी रंगात उपलब्ध होईल. हा भारतात ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध होईल. ह्यासोबत यूजर्सला डबल डाटा बेनिफिट प्लानसुद्धा मिळत आहे. त्यासोबत एअरटेल ६ महिन्यासाठी ४५०० रुपये किंमतीचा डाटा देणार आहे. त्याचबरोबर एक ब्लूटुथ हेडसेटसुद्धा मोफत मिळेल आणि Viu चे मोफत सब्सक्रिप्शनसुद्धा मिळेल.
ह्यात ७ इंचाची TFT WXGA डिस्प्ले दिली आहे. ज्याचे रिझोल्युशन 1280×800 पिक्सेल आहे. हा फोन 1.5GHz क्वाड-कोर प्रोसेसर आणि 1.5GB च्या रॅमने सुसज्ज आहे. ह्याला 16GB च्या अंतर्गत स्टोरेजसह लाँच केले आहे.
हेदेखील वाचा – भारतीय बाजारात सर्वाधिक विकले गेलेले हे नोकियाचे जबरदस्त फोन्स…
हा अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. ह्यात 8MP चा रियर कॅमेरा आणि 2MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे.
हा 4000mAh बॅटरीने सुसज्ज आहे. हा एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे. ह्यात VoLTE 4G सपोर्ट देण्यात आले आहे.
हेदेखील वाचा – तुमच्या मोबाईल इंटरनेटचा स्पीड माहित करुन घेण्यासाठी वापरा हा MySpeed App
हेदेखील वाचा – एसर ट्रॅवलमेट X349 लॅपटॉप लाँच, 8GB रॅमने सुसज्ज