Samsung ने भारतात आपल्या नेक्स्ट गॅलेक्सी स्मार्टफोनची प्री-बुकिंग सुरू करण्याची घोषणा केली आहे. Samsung Galaxy Z Fold 4 आणि Galazy Z Flip 4 स्मार्टफोन 10 ऑगस्ट रोजी Galaxy Unpacked इव्हेंटमध्ये लाँच केले जातील. अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार, फोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 1,999 रुपये टोकन मनी भरावे लागतील. स्मार्टफोनची ऑर्डर प्री-बुक करणाऱ्या ग्राहकांना विशेष ऑफर दिली जाणार आहे. दक्षिण कोरियाची कंपनी जागतिक कार्यक्रमाचे आयोजन करत आहे आणि ते संध्याकाळी 6.30 वाजता भारतात लाईव्ह स्ट्रीम केले जाणार आहे.
हे सुद्धा वाचा : JIO चा 'हा' प्लॅन मिळतोय 150 रुपयांनी स्वस्त, मिळेल दररोज 1.5GB डेटा आणि 84 दिवसांची वैधता
कंपनी या फोन्सच्या प्री-बुकिंगवर अमेरिकेतील ग्राहकांना $200 म्हणजेच सुमारे 16,600 रुपयांपर्यंत सॅमसंग स्टोअर क्रेडिट ऑफर करत आहे. सॅमसंगने अद्याप कोणत्याही स्मार्टफोनचे नाव जाहीर केले नसून 'नेक्स्ट गॅलेक्सी स्मार्टफोन्स'चा उल्लेख केला आहे. हे फोल्डेबल हँडसेट असणार आहेत. नवीन फोल्डेबल फोन व्यतिरिक्त, Galaxy Watch 5 स्मार्टवॉच आणि Galaxy Buds 2 Pro TWS इयरफोन देखील या इव्हेंटमध्ये लाँच केले जाऊ शकतात, असेही वृत्त आहे.
Samsung Galaxy Z Fold 4 आणि Galaxy Z Flip 4 स्मार्टफोन्स संबंधित अनेक लीकमध्ये माहिती समोर आली आहे. नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टमध्ये सॅमसंगच्या फोल्डेबल स्मार्टफोन्सचे कलर ऑप्शन्स लीक झाले होते. Galaxy Z Fold 4 सीड, ग्रे-ग्रीन आणि फँटम ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध केल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, Galaxy Z Flip 4 गोल्ड, ग्रे, लाइट ब्लू आणि पर्पल कलर वेरिएंटमध्ये आणला जाऊ शकतो.
Galaxy Unpacked 10 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6.30 वाजता थेट प्रवाहित केले जाईल. हे स्ट्रीमिंग सॅमसंग न्यूजरूम इंडिया, सॅमसंग डॉट कॉम आणि सॅमसंगच्या यूट्यूब चॅनेलवर होईल.
अलीकडेच Samsung ने भारतातील ग्राहकांसाठी 'buy now, pay later' सर्व्हिस जाहीर केली आहे. विशेषतः ही सेवा फक्त Samsung Galaxy S22 सीरीज आणि फोल्डेबल Fold 3 आणि Flip 3 स्मार्टफोनसाठी आहे. सॅमसंगचे म्हणणे आहे की, कंपनी प्रथमच आपल्या फ्लॅगशिप आणि फोल्डेबल फोनवर ही सर्व्हिस देत आहे. या सेवेमुळे ग्राहकांना 'कंपनीकडून अधिक सहजपणे प्रीमियम स्मार्टफोन खरेदी' करता येणार आहे.