मागील काही दिवसांपासून भारतीय टेक विश्वात Samsung च्या नव्या Samsung Galaxy F55 5G फोनच्या लाँचची चर्चा सुरु होती. आता अखेर स्मार्टफोनच्या भारतीय लाँच डेटची पुष्टी केली गेली आहे. केवळ लाँच डेटच नाही तर कंपनीने फोनची किंमत रेंज देखील उघड केली आहे. हा सॅमसंग फोन लेदर बॅक पॅनलसह येईल. चला तर मग जाणून घेऊयात आगामी फोनशी संबंधित सर्व तपशील-
हे सुद्धा वाचा: iQOO Z9x 5G फोन लाँचपूर्वी फीचर्स Confirm! 6000mAh बॅटरीसारख्या Powerful फीचर्ससह होणार दाखल। Tech News
Samsung India कंपनीने आपल्या अधिकृत X (ट्विटर) हँडलद्वारे Samsung Galaxy F55 5G फोनच्या लाँच तारखेची पुष्टी केली आहे. हा फोन 17 मे रोजी दुपारी 12 वाजता लाँच होणार आहे. आम्ही सांगितल्याप्रमाणे, कंपनीने फोनच्या लाँच डेटसह किंमतीबद्दल देखील माहिती दिली आहे. कंपनीच्या मते, या फोनची सुरुवातीची किंमत 2X999 रुपये असेल. यावरून हा फोन 30,000 रुपयांपेक्षा कमी असेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
अलीकडेच कंपनीने फोनच्या भारतात लॉन्चची पुष्टी केली होती. त्याबरोबरच, आगामी फोनच्या टीझर Video च्या माध्यमातून फोनची पहिली झलक पाहायला मिळाली आहे. यामध्ये, फोन लेदर बॅक पॅनेलसह दिसू शकतो, जो सॅडल स्टिच पॅटर्नसह नॉक करेल. या फोनमध्ये Apricot Crush आणि Raisin Black असे दोन कलर ऑप्शन्स उपलब्ध असतील.
Samsung Galaxy F55 फोनमध्ये फुल HD+ डिस्प्ले असेल. सुरळीत कामकाजासाठी, हा फोन Qualcomm Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज असेल. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, यात 8GB रॅम मिळेल. हा फोन 8GB+128GB, 8GB+256GB आणि 12GB+256GB मॉडेल्समध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे.