साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung ने गेल्या वर्षी त्यांच्या Galaxy F सिरीजअंतर्गत भारतात मिड रेंजचा स्मार्टफोन Samsung Galaxy F55 5G फोन लाँच केला. वर्षभरानंतर हा फोन आता हजारो रुपयांच्या सवलतीसह विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. स्टायलिश लूक आणि उत्तम स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज Samsung फोन 10,000 रुपयांपेक्षा जास्त सवलतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. जाणून घेऊयात Samsung Galaxy F55 5G ची किंमत, ऑफर्स आणि सर्व तपशील-
Also Read: iQOO Z10 5G सिरीज भारतात लाँच! सर्वात मोठ्या बॅटरीसह भारतातील पहिला फोन, किंमतही कमी
Samsung Galaxy F55 5G हा फोन 8GB रॅम+ 128GB स्टोरेजसह 26,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता. आता हाच मोबाईल व्हेरिएंट शॉपिंग साइट Amazon वर 16,600 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. म्हणजेच या फोनवर तुम्हाला तब्बल 10,000 रुपयांची सूट मिळत आहे. महत्त्वाचे लक्षात घ्या की, ही ऑफर Raisin Black करत व्हेरिएंटसह उपलब्ध आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
Samsung Galaxy F55 5G फोनमध्ये 1080x 2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.7-इंच लांबीचा HD प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. ही पंच-होल स्टाइल स्क्रीन सुपर AMOLED वर बनवली आहे, जी 120Hz रिफ्रेश रेटसह आहे. उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या Samsung 5G फोनमध्ये प्रोसेसिंगसाठी Qualcomm चा Snapdragon 7 Gen 1 चिपसेट देण्यात आला आहे. सुरक्षेसाठी यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, तसेच पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी फोनला IP67 रेटिंग मिळाले आहे.
फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy F55 5G ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. या फोनच्या मागील पॅनलवर LED फ्लॅशसह सुसज्ज 50MP मुख्य OIS सेन्सर आहे. त्याबरोबरच, या फोनमध्ये 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2MP चा मॅक्रो लेन्स आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी या 5G फोनमध्ये 50MP चा फ्रंट कॅमेरा देखील आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 5000mAh ची पॉवरफुल बॅटरी दिली आहे. जलद चार्जिंगसाठी, या स्मार्टफोनमध्ये 45W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान देखील देण्यात आले आहे.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.