Its Here! Samsung Galaxy F55 5G स्मार्टफोन अखेर भारतात लाँच, तुमच्या बजेटमध्ये आहे का किंमत? Tech News

Updated on 27-May-2024
HIGHLIGHTS

बहुप्रतीक्षित Samsung Galaxy F55 5G स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच

Samsung Galaxy F55 5G स्मार्टफोन दोन आकर्षक कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे.

सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 50MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध

साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung च्या आगामी स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची चर्चा बऱ्याच काळापासून सुरु होती. आता अखेर कंपनीने Samsung Galaxy F55 5G स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत दाखल केला आहे. हा स्मार्टफोन दोन आकर्षक आणि बहुचर्चित कलर व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. विशेष म्हणजे Samsung Galaxy F55 5G हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह आणण्यात आला आहे. जाणून घेउयात स्मार्टफोनची किंमत आणि सर्व फीचर्स-

Also Read: 50MP कॅमेरासह Realme Narzo N65 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत। Tech News

Samsung Galaxy F55 5G ची भारतीय किंमत

Samsung Galaxy F55 5G च्या 8GB रॅमसह 128GB इंटर्नल स्टोरेज बेस व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये आहे. तर, फोनच्या 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेजसह टॉप व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Samsung च्या नवीन स्मार्टफोनवर 2000 रुपयांची सूट दिली जात आहे. एवढेच नाही तर, Galaxy Fit3 आणि अडॅप्टर अर्ली ऍक्सेसमध्ये खूप कमी किमतीत खरेदी करण्याची संधी असेल.

samsung galaxy f55 5g

उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन Flipkart वर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. या स्मार्टफोनची अर्ली ऍक्सेस सेल आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून सुरू होईल. हा फोन Apricot Crush आणि Raisin Black कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.

Samsung Galaxy F55 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच लांबीचा फुल HD+ Super AMOLED Plus डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, Samsung च्या या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसर उपलब्ध आहे. विशेषतः Snapdragon 7 Gen 1 मोबाइल प्लॅटफॉर्म हे तुमचे एकूण गेमिंग पॅकेज आहे. हा प्लॅटफॉर्म हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी, तसेच हार्ट-पंपिंग ऑडिओ आणि व्हिज्युअलसह एपिक मोबाइल गेमिंग प्रदान करतो.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy F55 5G फोनच्या मागील बाजूस OIS सपोर्टसह 50MP मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय, मागील बाजूस 8MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 2MP मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 50MP चा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे. सॅमसंगचा हा फोन 5000mAh बॅटरीसह येतो, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर, स्टिरिओ स्पीकर, NFC, USB टाईप-C सारखी अनेक दमदार फीचर्स आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :