Samsung Galaxy F55 5G चे भारतीय लाँच Confirm! लेदर फिनिशमध्ये ‘या’ दिवशी होणार दाखल। Tech News

Updated on 29-Apr-2024
HIGHLIGHTS

Samsung Galaxy F55 5G फोनच्या भारतीय लाँचची पुष्टी

Samsung ने X प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत माहिती दिली.

Samsung चा नवीन फोन Flipkart आणि Samsung.com वर विकला जाण्याची पुष्टी

मागील काही दिवसांपासून Samsung च्या F सीरीज स्मार्टफोन Samsung Galaxy F55 5G बद्दल चर्चा सुरू आहे. दरम्यान, आता Samsung Galaxy F55 5G फोनच्या भारतीय लाँचची पुष्टी ब्रँडने केली आहे. एवढेच नाही तर, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर डिव्हाइसचा एक नवीन टीझर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये फोन व्हेगन लेदर फिनिशसोबत दिसत आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Samsung Galaxy F55 5G लॉन्चिंग डिटेल्स आणि सर्व लीक्स-

हे सुद्धा वाचा: 32MP सेल्फी आणि 108MP बॅक कॅमेरासह Infinix GT 20 Pro ग्लोबली लाँच, बघा Powerful स्पेसिफिकेशन्स। Tech News

Samsung Galaxy F55 5G चे भारतीय लॉन्चिंग डिटेल्स

Samsung ने आज अधिकृतपणे आपल्या नव्या Galaxy F55 5G स्मार्टफोनला टीज केले आहे. कंपनीने X प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत माहिती दिली की, हा डिवाइस लवकरच भारतीय बाजारात लाँच केला जाईल. टीझर दर्शविते की आगामी डिव्हाइस मागील पॅनेलवर व्हेगन लेदर फिनिशसह केशरी रंगात येईल.

पोस्टमध्ये तुम्ही बघू शकता की, Samsung Galaxy F55 5G मोबाईलच्या मागील पॅनलमध्ये तीन कॅमेरा सेन्सर देखील दिसत आहेत. याचाच अर्थ हा फोन ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि LED फ्लॅशने सुसज्ज असेल. त्याबरोबरच, टीझरमध्ये, Samsung चा नवीन फोन Flipkart आणि Samsung.com वर विकला जाण्याची पुष्टी देखील करण्यात आली आहे. मात्र, फोनची लाँच डेट अजूनही पडद्याआड आहे. येत्या काही दिवसांत फोनची लाँच डेट देखील उघड करण्यात येईल.

Samsung Galaxy F55 5G बद्दल सर्व लीक्स

अलिकडेच पुढे आलेल्या लीकनुसार, Samsung Galaxy F55 5G फोन तीन व्हेरिएंटसह लाँच होण्याची शक्यता आहे. लीकनुसार, फोनचा 8GB रॅम + 128GB पर्याय 26,999 रुपयांमध्ये येऊ शकतो. 8GB RAM + 256GB व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये असू शकते. तर, टॉप मॉडेल 12GB RAM + 256GB व्हेरिएंटची किंमत 32,999 रुपये असण्याची शक्यता आहे.

त्याबरोबरच, लीकनुसार Samsung Galaxy F55 5G फोनमध्ये 6.7 इंच लांबीचा सुपर AMOLED प्लस डिस्प्ले असू शकतो. जो FHD+ रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेटसह येऊ शकतो. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसर असू शकतो. फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यामध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि दुसरी लेन्स मिळेल. आकर्षक सेल्फीसाठी 50MP फ्रंट कॅमेरा असू शकतो. पॉवरसाठी यात 5000 mAh बॅटरी असण्याची अपेक्षा आहे, जी 45W जलद चार्जिंगला सपोर्ट करू शकते.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :