प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung च्या आगामी Samsung Galaxy F55 5G फोनची चर्चा सध्या जिकडे तिकडे सुरु आहे. हा स्मार्टफोन येत्या 17 मे रोजी भारतात लाँच होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कंपनी इंटरनेटवर आपल्या आगामी मोबाईल टीज करत आहे. आज या स्मार्टफोनचे प्रोडक्ट पेज Flipkart वर लाइव्ह करण्यात आले आहे. दरम्यान, Samsung Galaxy F55 5G चे स्पेसिफिकेशन्स लाँच होण्यापूर्वीच या पेजवर शेअर केले गेले आहेत.
वर सांगितल्याप्रमाणे, Flipkart वर Samsung Galaxy F55 5G चे सर्व स्पेसिफिकेशन्स उघड झाले आहेत.
Samsung F55 5G फोनमध्ये पंच-होल स्टाइल sAMOLED डिस्प्ले असेल. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह कार्य करेल. त्याबरोबरच, हा मोबाईल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला देखील सपोर्ट करेल.
Samsung Galaxy F55 5G फोन Qualcomm Snapdragon 7 Gen 1 octacore प्रोसेसरसह सादर केला जाईल. Snapdragon 7 Gen 1 मोबाइल प्लॅटफॉर्म हे तुमच्यासाठी एकूण गेमिंग पॅकेज आहे. हा प्लॅटफॉर्म हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी, तसेच व्हिज्युअलसह एपिक मोबाइल गेमिंग ऑफर करतो.
Samsung Galaxy F55 5G फोन 8GB RAM आणि 12GB RAM सह सुसज्ज आहे. या दोन मॉडेल्समध्ये अनुक्रमे 8GB व्हर्च्युअल रॅम आणि 12GB व्हर्च्युअल रॅम मिळेल, अशी माहिती मिळाली आहे.
फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy F55 5G च्या बॅक पॅनलवर ट्रिपल रिअर कॅमेरा दिला जाईल. यामध्ये 50MP OIS कॅमेरा, 5MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2MP थर्ड सेन्सर मिळेल. त्याबरोबरच, फोनमध्ये सेल्फी व्हिडिओ कॉलिंगसाठी 50MP फ्रंट कॅमेरा देखील देण्यात येईल.
फोनमध्ये 45W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीच्या सपोर्टसह बॅटरी मिळेल, असे फ्लिपकार्टच्या प्रोडक्ट पेजवरून बॅटरीबद्दल पुढे आले आहे.