बरेच दिवसांपासून चर्चेत असलेला Samsung Galaxy F54 5G स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. हा कंपनीचा मिड रेंज स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनमध्ये जबरदस्त कॅमेरा फीचर्स आणि जंबो बॅटरी उपलब्ध आहे. यासह तुम्हाला फास्ट चार्जिंग आणि फोटोग्राफीचा उत्तम एक्सपेरियन्स मिळणार आहे. जाणून घेऊयात किमंत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स –
वर सांगितल्याप्रमाणे Samsung Galaxy F54 5G स्मार्टफोन मिड रेंजमध्ये सादर करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किमंत 27,999 रुपये इतकी आहे. फोनची प्री-बुकिंग कंपनीच्या अधिकृत साईट आणि फ्लिपकार्टवर आज तीन वाजतापासून सुरु झाली आहे. हा फोन स्टारडस्ट सिल्वर आणि मिटीऑर ब्लु कलर ऑप्शन मिळणार आहे.
फोनमध्ये 6.7-इंच लांबीचा फुल-HD + AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. यासह कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन देखील उपलब्ध आहे. याशिवाय हा फोन Samsung Exynos 1380 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यासोबत 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज देण्यात आले आहे. फोनचे स्टोरेज मायक्रो SD कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येईल.
6,000mAh जंबो बॅटरी देण्यात आली आहे, ज्यासोबत 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. फोन सिंगल चार्जवर जवळपास 20 तासांपर्यंत चालेल, असा कंपनीचा दावा आहे. ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप तुम्हाला या फोनमध्ये मिळणार आहे. ज्याचा प्रायमरी कॅमेरा OIS सपोर्टसह 108MP, 8MP अल्ट्रा वाईड सेन्सर आणि 2MP चा तिसरा कॅमेरा आहे. फ्रंटला 32MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.