या महिन्याच्या सुरुवातीला प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung ने Samsung Galaxy F54 5G नवीनतम स्मार्टफोन लाँच केला होता. आज म्हणजेच 20 जून रोजी अखेर या फोनची विक्री सुरु झाली आहे. हा फोन Flipkart आणि Samsung India वेबसाईटवर सुरु झाली आहे. कंपनीने Samsung Galaxy F54 5G एकाच 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, हा एक मिड रेंज स्मार्टफोन आहे, जो उत्तम ऑफर्ससह विक्रीसाठी उपलब्ध आहे.
वर सांगितल्याप्रमाणे हा स्मार्टफोन एकाच व्हेरिएंटमध्ये येतो. फोनची किंमत 29,999 रुपये आहे. सेल दरम्यान, काही जबरदस्त ऑफर्स देखील मिळत आहेत. बँक ऑफर्सबद्दल बोलयचे झाल्यास HDFC आणि SBI कार्डद्वारे फोन खरेदी व्यवहार केल्यास 2,000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. फोन स्टारडस्ट सिल्व्हर आणि ब्लू कलर ऑप्शन उपलब्ध आहेत.
सॅमसंग फोनमध्ये 6.7-इंच लांबीचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. फोन Samsung Exynos 1380 प्रोसेसर आहे, ज्यामध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळेल. खरं तर, फोनचे स्टोरेज मायक्रो SD कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येते.
Samsung Galaxy F54 5G फोनमध्ये 6,000mAh जंबो बॅटरी आहे, ज्यासह 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. फोन एका चार्जवर 20 तासांपर्यंत चालेल, असा दावा कंपनीने केला आहे. कॅमेरा स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झल्यास, तो 108MP चा प्रायमरी कॅमेरा तुम्हाला फोनमध्ये मिळेल. यासह OIS सपोर्ट उपलब्ध आहे. याशिवाय, 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2MP चा तिसरा कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP कॅमेरा आहे.