Samsung चा Affordable 5G स्मार्टफोन 3000 रुपयांची झाला स्वस्त, जाणून घ्या नवी किंमत। Tech News

Updated on 07-Feb-2024
HIGHLIGHTS

Samsung Galaxy F34 च्या किमतीत घट करण्यात आली आहे.

हा स्मार्टफोन कंपनीने ऑगस्ट 2023 मध्ये लाँच केला होता.

नवीन किमतीसह फोन Flipkart आणि Samsung ई-स्टोअरवर ऑनलाइन उपलब्ध

Samsung भारतात सध्या आपल्या स्मार्टफोन्सच्या किमतीत कपात करत आहे. होय, कंपनीने आपल्या आणखी एका मिड-रेंज स्मार्टफोन Samsung Galaxy F34 च्या किंमतीत कपात केली आहे. हा हँडसेट दोन व्हेरिएंटमध्ये बाजारात उपलब्ध आहे. दोन्ही व्हेरिएंटच्या किमतीत 3000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन इलेक्ट्रिक ब्लॅक, मिस्टिक ग्रीन आणि ऑर्किड व्हायलेट कलर पर्यायांमध्ये येतो. चला तर मग जाणून घेऊयात किमतीतील कपातीनंतर या फोनची नवी किंमत-

हे सुद्धा वाचा: Price Cut! Samsung चा ‘हा’ स्वस्त 5G फोन झाला कायमचा स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत। Tech News

Samsung Galaxy F34 ची नवीन किंमत

Samsung ने ऑगस्ट 2023 मध्ये हा फोन भारतात लाँच केला होता. त्यावेळी या फोनच्या 6GB + 128GB वेरिएंटची किंमत 18,999 रुपये आहे आणि 8GB + 128GB मॉडेलची किंमत 20,999 रुपये आहे. मात्र, 3000 रुपयांच्या किमतीत कपात केल्यानंतर ग्राहक आता त्याचे 6GB व्हेरिएंट 15,999 रुपये आणि 8GB व्हेरिएंट 17,999 रुपयांना खरेदी करू शकतात. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, ग्राहक ते फ्लिपकार्ट आणि सॅमसंग ई-स्टोअरवरून ऑनलाइन खरेदी करू शकतात. फोन देशातील अधिकृत रिटेल स्टोअरमध्ये ऑफलाइन देखील खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Samsung Galaxy F34 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy F34 5G स्मार्टफोन 6.46-इंच लांबीचा सुपर AMOLED FHD+ डिस्प्लेसह येतो. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला देखील सपोर्ट करतो. तसेच, डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी या फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देण्यात आला आहे. कामगिरीसाठी, या फोनमध्ये Exynos 1280 चिपसेट आहे. हे Android 13-आधारित Samsung च्या One UI वर कार्य करते. कंपनीने या 5G फोनमध्ये 4 वर्षांचे OS अपडेट्स आणि 5 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स देण्याचे वचन देखील दिले आहे.

स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. ज्यामध्ये 50MP मुख्य सेन्सर, 8MP अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स आणि 2MP मॅक्रो कॅमेरा समाविष्ट आहे. तसेच, आकर्षक सेल्फीसाठी समोर 13MP शूटर देण्यात आला आहे. याशिवाय, बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी आहे. जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. यासह तुमचा फोन जलद चार्ज होईल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :