भारतात 5G फोनची मागणी झपाट्याने वाढत आहे. कारण 5G चे युग आल्यानंतर नक्कीच नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 5G कनेक्टिव्हिटी प्राथमिकता असायला हवी. जर चांगल्या फीचर्ससह 5G फोन स्वस्त दरात हवा असेल तर एक उत्तम संधी आली आहे. आम्ही तुमच्यासाठी अशाच एका 5G फोनची सर्वोत्तम डील आणली आहे. होय, लोकप्रिय Samsung Galaxy F34 5G त्याच्या लाँच किमतीपेक्षा 4,500 रुपयांपर्यंत स्वस्त खरेदीसाठी उपलब्ध आहे.
हे सुद्धा वाचा: दीर्घकालीन वैधतेसह Jio चा अप्रतिम प्लॅन, मिळेल डेली 3GB डेटा, Unlimited कॉल्स आणि OTT सबस्क्रीप्शन। Tech News
Samsung Galaxy F34 5G फोन भारतात ऑगस्ट महिन्यात लाँच करण्यात आला होता. फोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत 18,999 रुपये इतकी होती. दरम्यान लाँचच्या केवळ दोन महिन्यानंतर तुम्ही 4,500 रुपयांपर्यंत स्वस्त किंमतीत खरेदी करू शकता.
ऑफरबद्दल सविस्तर बोलायचे झाल्यास, या नवीन दरामध्ये कंपनीने 2,500 रुपयांची सूट दिली आहे. तर, बँक ऑफरवर देखील कमाल 2,000 रुपये सूट देण्यात आली आहे. यात HDFC क्रेडिट/डेबिट कार्डवर 1500 रुपये झटपट सवलत, Axis बँक क्रेडिट कार्ड 10% कॅशबॅक उपलब्ध आहे.
तुम्ही सॅमसंगच्या अधिकृत साईट आणि Flipkart वरून हा फोन खरेदी करू शकता. फ्लिपकार्ट हा फोनवर आणखी ऑफर्ससह खरेदी करण्याची संधी देत आहे. मात्र, या ऑफर्सचा लाभ तुम्ही लवकरात लवकर घ्यावा.
हा सॅमसंग स्मार्टफोन 6.5 इंच फुल HD+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीन एका AMOLED पॅनेलवर बनविली गेली आहे, जी 120Hz रिफ्रेश दराने कार्य करते. कंपनीने डिस्प्ले गोरिल्ला ग्लास 5 ने संरक्षित केले आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी या फोनमध्ये Exynos 1280 ऑक्टाकोर प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. ज्यासह, 6GB रॅम आणि 8GB रॅम मिळेल. हे दोन्ही मॉडेल 128GB स्टोरेजला सपोर्ट करतात, जी 1TB पर्यंत वाढवता येईल.
फोटोग्राफीसाठी, त्याच्या मागील पॅनलवर 50MP प्रायमरी सेन्सर + 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स + 2MP मॅक्रो सेन्सर आहे. त्याबरोबरच, फ्रंट पॅनलवर 13MP सेल्फी सेन्सर देखील मिळेल. फोनमध्ये 6,000mAh ची बॅटरी आहे, जी फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते.