Samsung Galaxy F34 5G Launch: भारीच की! एकाच शॉटमध्ये घ्या 4 फोटो, आकर्षक फीचर्ससह मस्त फोटोग्राफी करा
Samsung ने Samsung Galaxy F34 5G भारतात लाँच केला आहे.
या हँडसेटच्या 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 18,999 रुपये आहे.
पहिल्या सेलमध्ये तुम्हाला Galaxy F34 5G साठी ICICI बँक आणि SBI कार्डवर 2000 रुपयांची सूट मिळेल.
साऊथ कोरियाची प्रसिद्ध कंपनी Samsung ने Samsung Galaxy F34 5G भारतात लाँच केला आहे. कंपनीचे प्रोडक्ट्स भारतीयांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत. हा स्मार्टफोन सर्व वापरकर्त्यांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या अप्रतिम फिचर्ससह येतो. चला तर मग बघुयात या नवीन 5G फोनची सर्व महत्वाची माहिती.
Samsung Galaxy F34 5G ची किंमत
या हँडसेटच्या 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 18,999 रुपये आहे, तर 8GB + 128GB मॉडेलची किंमत 20,999 रुपये आहे. Samsung Galaxy F34 इलेक्ट्रिक ब्लॅक आणि मिस्टिक ग्रीन या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो.
उपलब्धता आणि ऑफर्स
Samsung Galaxy F34 5G 12 ऑगस्टपासून Flipkart, Samsung च्या वेबसाइटवर आणि निवडक रिटेल स्टोअरवर खरेदीसाठी उपलब्ध असेल. तर, स्मार्टफोनचे प्री-ऑर्डर सुरू झाले आहेत. पहिल्या सेलमध्ये तुम्हाला Galaxy F34 5G साठी ICICI बँक आणि SBI कार्डवर 2000 रुपयांची सूट मिळेल. याशिवाय 2000 रुपयांचा एक्सचेंज बोनसही मिळेल. या ऑफर्ससह तुम्ही फोन स्वस्तात खरेदी करू शकता.
Samsung Galaxy F34 5G चे तपशील
हा नवीन Samsung स्मार्टफोन 6.5-इंच लांबीच्या FHD+ 120Hz sAMOLED डिस्प्लेसह येतो. या डिस्प्लेस तुमचा पाहण्याचा अनुभव जबरदस्त व्हिज्युअल आणि व्हायब्रंट कलर्ससह वाढवतो. त्याबरोबरच, यासह तुम्हाला चमकदार सूर्यप्रकाशातही कंटेंट सहज वाचता येईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, Galaxy F34 5G स्मार्टफोनमध्ये Exynos 1280 5nm प्रोसेसर आहे. या प्रोसेसरसह तुम्हाला अखंड कार्यप्रदर्शन मिळेल. तसेच, डिव्हाइस Android वर आधारित One UI 5.1 वर कार्य करते. कंपनीने 4 वर्षांपर्यंत OS अपग्रेड आणि 5 वर्षांपर्यंत सिक्योरिटी अपडेट्स देण्याचे आश्वासन दिले आहे. फोनमध्ये मोठी 6000mAh बॅटरी आहे, याच्या मदतीने तुम्ही ब्राउझिंग, स्ट्रीमिंग आणि मल्टीटास्किंग सुरळीतपणे दीर्घ तास करू शकता.
कॅमेरा फीचर्स
आता तुम्ही ज्या विषयाची प्रतीक्षा करत आहात, त्या विषयाकडे वळूयात. Samsung Galaxy F34 5G ची अत्याधुनिक कॅमेरा फीचर्स तुमचा फोटोग्राफी अनुभव वाढवतील. स्मार्टफोनचा 50MP नो शेक कॅमेरा प्रत्येक शॉट क्रिस्टल क्लिअर आणि ब्लर-फ्री असल्याची खात्री करतो. तसेच सिंगल टेक फीचरसह, तुम्ही फक्त शटरवर क्लिक करून 4 फोटो आणि 4 व्हिडिओ एकाच वेळी कॅप्चर करू शकता. यामुळे परफेक्ट शॉट निवडण्यात तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. कारण हा फोन स्वतःच तुमच्यासाठी परफेक्ट शॉट निवडेल.
एवढेच नाही, त्याचा नाइटोग्राफी मोड तुमच्या कमी-प्रकाशातील फोटो देखील अप्रतिम काढेल. हे फिचर तुमचे रात्रीचे शॉट्स अधिक ब्राईट बनवते. याशिवाय, फन मोडच्या मदतीने, तुम्ही क्रिएटिव्ह फिल्टर्स, स्टिकर्स आणि एआर इफेक्ट्सचा प्रयोग देखील करू शकता, यासह तुमचे फोटोज अधिक मजेशीर होतील.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile