200MP कॅमेरासह SAMSUNGचा सर्वोत्तम स्मार्टफोन्स, मिळेल आकर्षक डिझाईन आणि प्रोसेसर

Updated on 21-Oct-2022
HIGHLIGHTS

Samsung Galaxy S23 Ultra लवकरच लाँच होणार

कंपनी फोनच्या मागील बाजूस 200 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा देणार आहे.

जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटमध्ये कंपनी ही सिरीज लाँच करण्याची शक्यता

Samsung सध्या Galaxy S23 सीरीज लाँच करण्याच्या तयारीत आहे. रिपोर्ट्सनुसार हा फोन पुढील वर्षाच्या सुरुवातीला बाजारात येऊ शकतो. जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटमध्ये कंपनी ही सिरीज लाँच करेल, अशी अपेक्षा आहे. सॅमसंगने अजूनही या सीरीजच्या लाँच डेटबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. पण दरम्यान, या सीरीजचा Galaxy S23 Ultra स्मार्टफोन बेंचमार्किंग प्लॅटफॉर्म गीकबेंच वर लिस्ट झाला आहे. 

हे सुद्धा वाचा : VI : 70 दिवसांच्या वैधतेसह जबरदस्त प्लॅन, दररोज 3GB डेटासह मोफत मिळेल HOTSTAR

हा फोन Android 13 वर काम करेल

गीकबेंचवर विश्वास ठेवला तर कंपनी फोनमध्ये कलामा कोडनेम प्रोसेसर देणार आहे. यावरून असा अंदाज लावला जात आहे की, फोनमध्ये सापडलेला प्रोसेसर Snapdragon 8 Gen 2 असू शकतो. या फोनला गीकबेंचच्या सिंगल-कोर टेस्टमध्ये 1521 आणि मल्टी-कोर टेस्टमध्ये 4689 गुण मिळाले आहेत. सूचीमध्ये असेही म्हटले आहे की, फोन किमान 8GB RAM सह येईल. फोन 12 GB रॅम आणि 512 GB इंटर्नल स्टोरेज पर्यायात देखील येईल. हा आगामी Samsung फोन Android 13 वर आधारित One UI 5.0 वर कार्य करेल.

फोनचे लीक झालेले डिझाइन रेंडर पाहता, असे म्हणता येईल की हा फोन वक्र स्क्रीन आणि सेंटर पंच-होल डिझाइनसह येईल. कंपनी फोनच्या मागील बाजूस 200 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा देणार आहे. याशिवाय 12 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 10 मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्स देखील येथे उपलब्ध असतील. कंपनी हा फोन बेज, ब्लॅक, ग्रीन आणि लाइट पिंक कलर ऑप्शनमध्ये लॉन्च करेल.

काही दिवसांपूर्वी हा फोन 3C या सर्टिफिकेशन वेबसाइटवरही दिसला आहे. या सूचीनुसार, फोन 25W फास्ट चार्जिंग आणि 5000mAh बॅटरीसह येईल. लीक झालेल्या रिपोर्ट्सनुसार, कंपनी या फोनमध्ये 6.8-इंच लांबीचा डायनॅमिक AMOLED QHD+ डिस्प्ले देणार आहे, जो 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल.

 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :