भारीच की ! SAMSUNGच्या 5G फोनवर 7 हजार रुपयांची सूट, तसेच 1 हजार रुपयांचा कॅशबॅक

भारीच की ! SAMSUNGच्या 5G फोनवर 7 हजार रुपयांची सूट, तसेच 1 हजार रुपयांचा कॅशबॅक
HIGHLIGHTS

Samsung Galaxy F23 फोन सवलतीसह खरेदी करा

ही ऑफर कंपनीच्या वेबसाईटवर लाईव्ह आहे

डिस्काउंटनंतर फोन 16,999 रुपयांना खरेदी करता येईल

SAMSUNG चा मिड-रेंज स्मार्टफोन Galaxy F23 उत्तम डिस्काउंट ऑफरसह तुम्हाला खरेदी करता येईल. फोनच्या 6 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज वेरिएंटची MRP 23,999 रुपये आहे. हा फोन तुम्ही कंपनीच्या वेबसाइटवरून 7 हजार रुपयांच्या डिस्काउंटनंतर 16,999 रुपयांना खरेदी करू शकता. तुमच्याकडे ICICI बँकेचे कार्ड असल्यास, तुम्हाला 1,000 रुपयांचा झटपट कॅशबॅक देखील मिळेल. ऑफर कंपनीच्या वेबसाईटवर लाईव्ह आहे. 

हे सुद्धा वाचा : 400 रुपयांमध्ये अप्रतिम प्लॅन ! एक कंपनी देतेय 150GB मोफत डेटा, तर दुसरीकडे Netflix आणि Hotstar मोफत

फोन चार्जरशिवाय येतो आणि तुम्हाला तो स्वतंत्रपणे खरेदी करावा लागेल. खास गोष्ट म्हणजे ऑफरमध्ये तुम्हाला कंपनीच्या वेबसाइटवरून 1,299 रुपये किमतीचा हा चार्जर 299 रुपयांना खरेदी कर ता येईल.

SAMSUNG Galaxy F23 5G 

samsung galaxy f23 5g

फोनमध्ये, कंपनी 1080×2408 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.6-इंच लांबीचा फुल HD + डिस्प्ले देत आहे. फोनमध्ये दिलेला हा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कंपनी त्यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देखील देत आहे. फोन 6 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे. प्रोसेसर म्हणून कंपनी यामध्ये Snapdragon 750G चिपसेट देत आहे.

फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh बॅटरी आहे. ही बॅटरी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi, Bluetooth, GPS/A-GPS, NFC, USB Type-C आणि 3.5mm हेडफोन जॅक सारखे पर्याय देण्यात आले आहेत. फोन Android 12 वर आधारित OneUI 4.1 वर काम करतो.

फोटोग्राफीसाठी कंपनी या फोनमध्ये LED फ्लॅशसह तीन कॅमेरे देत आहे. यामध्ये 50-मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरासह 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो शूटरचा समावेश आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 8-मेगापिक्सेल कॅमेरा आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo