Samsung Galaxy F15 5G Airtel Edition भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy F15 5G Airtel Edition भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
HIGHLIGHTS

Samsung Galaxy F15 5G Airtel Edition भारतीय बाजारात लाँच

नवा Samsung Galaxy F15 5G Airtel Edition स्मार्टफोन बजेट श्रेणीत दाखल

Samsung च्या या Airtel बेनिफिट्सदेखील समाविष्ट करण्यात आले आहेत.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माताच्या Samsung Galaxy F15 5G फोनचे नवे Airtel Edition भारतीय बाजारात लाँच झाला आहे. नावावरूनच समजले असेल की, कंपनीने Airtel च्या सहकार्याने हा स्मार्टफोन सादर केला आहे. हा फोन Groovy Violet, Jazzy Green आणि Ash Black कलर ऑप्शन्समध्ये येतो. विशेष फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आहे. तर, फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये 25W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देखील उपलब्ध आहे.

Also Read: लेटेस्ट Oppo F27 Pro+ 5G भारतीय बाजारात लाँच! पाण्यातही वापरता येईल स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत

Samsung Galaxy F15 5G Airtel Edition ची किंमत

Samsung ने नवा Samsung Galaxy F15 5G Airtel Edition स्मार्टफोन 11,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत सादर केला आहे. आज दुपारपासून Flipkart वर या फोनची विक्री सुरू झाली आहे. या फोनच्या 6GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 14,499 रुपये आहे. तर, 8GB RAM + 128GB मॉडेलची किंमत 15,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

Samsung Galaxy F15 5G
Samsung Galaxy F15 5G

वर सांगितल्याप्रमाणे, हा स्मार्टफोन Samsung ने Airtel च्या सहकार्याने बनवला आहे. लक्षात घ्या की, या फोनवर तुम्हाला Airtel ची सिम 18 महिन्यांपर्यंत वापरावी लागेल. त्यामुळे, यात Airtel बेनिफिट्सदेखील समाविष्ट करण्यात आले आहेत. Airtel युजर्सना या फोनवर एकूण 750 रुपयांचा ऑफ मिळणार आहे. यासह 50GB डेटाचे कुपन देखील मिळेल. मात्र, यासाठी युजर्सना कमीत कमी 199 रुपयांचे रिचार्ज करावे लागणार आहे.

Samsung Galaxy F15 5G Airtel Edition चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy F15 5G Airtel Edition फोनमध्ये 6.5 इंच लांबीचा फुल HD+ sAMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसरसह सुसज्ज आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 128GB स्टोरेज मिळेल. या फोनचे स्टोरेज मायक्रो SD कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा मिळेल. त्याबरोबरच, यात 5MP अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. यासह मागील पॅनलवर एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे. तसेच, आकर्षक सेल्फीसाठी फोनमध्ये 13MP फ्रंट कॅमेरा आहे. पॉवरसाठी, फोनमध्ये 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo