नवीन Samsung Galaxy F15 5G स्मार्टफोन अखेर अधिकृतपणे भारतीय बाजारात लाँच झाला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा स्मार्टफोन कंपनीने बजेट रेंजमध्ये सादर केला आहे. या स्मार्टफोनमध्ये एक मोठी बॅटरी, सभ्य चिपसेट आणि चार वर्षांच्या Android अपडेट्ससह अनेक उत्कृष्ट फीचर्स मिळतील. हा फोन समान किंमत श्रेणीमध्ये बाजारात नवीन लाँच झालेल्या Redmi, Moto इ. स्मार्टफोन्सशी जबरदस्त स्पर्धा करेल. जाणून घेऊयात नव्या फोनची किंमत आणि सर्व तपशील-
हे सुद्धा वाचा: How to: युजर्ससाठी Good News! Flipkart UPI सेवा भारतात लाँच, ‘अशा’प्रकारे चुटकीसरशी ऍक्टिव्ह करा
या नवीन Samsung फोनच्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज बेस मॉडेलची किंमत 15,999 रुपये आहे. तर, 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह टॉप-एंड व्हेरिएंटची किंमत 16,999 रुपये इतकी आहे. हा फोन Amazon वर अर्ली सेल दरम्यान आज संध्याकाळी 7 वाजता खरेदीसाठी उपलब्ध होईल.
ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर ग्राहकांना HDFC बँकेकडून 1000 रुपयांची सूट मिळू शकते. हा फोन ॲश ब्लॅक, जॅझी ग्रीन आणि ग्रूवी व्हायलेटमध्ये या कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.
Samsung Galaxy F15 5G स्मार्टफोन 6.5-इंच लांबीच्या FHD+ sAMOLED डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे, जो 90Hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. परफॉर्मन्ससाठी या फोनमध्ये तुम्हाला MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसरची पॉवर मिळेल. स्टोरेज सेक्शनमध्ये 6GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज मिळणार आहे. ही स्टोरेज मायक्रो SD कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येईल. इतकेच नाही तर, रॅम प्लस फिचरसह 12GB पर्यंत रॅम देखील वाढवता येईल.
त्याबरोबरच, फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनच्या मागील बाजूस एक ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये एक 50MP प्रायमरी शूटर, आणखी 50MP सेन्सर आणि 2MP मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. याशिवाय, यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 13MP फ्रंट-फेसिंग कॅमेरा देखील आहे. यात मोठी 6000mAh बॅटरी आहे जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोनसह कंपनीने चार वर्षांसाठी Android अपडेट्स देण्याचे वचन दिले आहे. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत या फोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक आणि 5G कनेक्टिव्हिटीसह नॉईज कॅन्सलेशन फीचर देखील मिळेल.