मागील बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेला Samsung Galaxy F15 5G फोनच्या भारतीय लाँच डेटची पुष्टी झाली आहे. हा कंपनीचा आगामी बजेट फोन असेल, जो पुढील महिन्यात भारतात लाँच होणार आहे. आगामी फोन Flipkart द्वारे खरेदी केला जाऊ शकतो. लाँचपूर्वीच फोनच्या काही फीचर्सची माहिती फ्लिपकार्ट लिस्टिंगद्वारे समोर आली आहे. चला तर मग बघुयात Samsung Galaxy F15 5G चे भारतीय लॉन्चिंग डिटेल्स आणि इतर सर्व तपशील-
हे सुद्धा वाचा: Loksabha Election 2024: Voter ID Card बनवण्यासाठी घरबसल्या Online अप्लाय करा, बघा सोपी प्रक्रिया
वर सांगितल्याप्रमाणे, कंपनीने Samsung Galaxy F15 5G फोनच्या लाँच डेटची पुष्टी केली आहे. हा फोन 4 मार्च रोजी दुपारी 12 वाजता लाँच केला जाईल. लॉन्च होण्याआधी हा सॅमसंग फोन फ्लिपकार्टवर लिस्ट करण्यात आला आहे. त्याबरोबरच, फ्लिपकार्ट सूचीद्वारे फोनच्या अनेक फीचर्सचे तपशील देखील समोर आले आहे.
होय, या सॅमसंग फोनमध्ये तुम्हाला sAMOLED डिस्प्ले मिळेल. याशिवाय, फोनमध्ये 6000mAh ची जंबो बॅटरी दिली जाईल. कंपनीने पुष्टी केली आहे की या फोनसह Android ऑपरेटिंग सिस्टम आवृत्ती अपग्रेड 4 वर्षांसाठी उपलब्ध असेल, तर सुरक्षा पॅच अद्यतने 5 वर्षांसाठी रोलआउट केले जातील.
Samsung Galaxy F15 5G फोन sAMOLED डिस्प्लेने सुसज्ज असेल. फ्रंट कॅमेरासाठी डिस्प्लेमध्ये वॉटरड्रॉप नॉच दिला जाईल. त्याबरोबरच, सुरळीत कामकाजासाठी सॅमसंग फोन MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसरने सुसज्ज असू शकतो. पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 6000mAh जम्बो बॅटरी दिली जाईल. एका चार्जवर हा फोन 2 दिवस वापरता येईल, असा कंपनीचा दावा आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, सॅमसंगच्या या फोनमध्ये ग्रीन, पर्पल आणि ब्लॅक असे तीन कलर ऑप्शन दिले जातील.