आगामी Affordable स्मार्टफोन Samsung Galaxy F15 चे भारतीय लाँच Confirm, मिळतील जबरदस्त फीचर्स। Tech News

Updated on 19-Feb-2024
HIGHLIGHTS

Samsung ने भारतात Galaxy F15 5G स्मार्टफोनच्या लाँचबाबत टीजिंग सुरू केले.

Samsung Galaxy F15 भारतात या महिन्यात 22 फेब्रुवारीला लाँच होऊ शकतो.

फोन ई-कॉमर्स साइट Flipkart वर व्रिकीसाठी उपलब्ध करून दिला जाईल

Samsung ने भारतात Samsung Galaxy F15 5G स्मार्टफोनच्या लाँचबाबत टीजिंग सुरू केली आहे. टीझर आता ‘Coming Soon’ मॅसेजसह Flipkart वर लाईव्ह आहे. कंपनी लवकरच या डिवाइसची अधिकृत लाँच डेट उघड करेल, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, Galaxy F15 5G प्रोमो पोस्टर्स समोर आले आहेत, ज्यामध्ये डिव्हाइसचे काही स्पेसिफिकेशन्स देखील उघड झाले आहेत. एवढेच नाही तर, लीकद्वारे डिव्हाइसची लाँच डेट देखील समोर आली आहे.

हे सुद्धा वाचा: मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी Xiaomi 14 Ultra चा कॅमेरा सज्ज, Latest फोन या महिन्यात होणार लाँच। Tech News

Samsung Galaxy F15 लीक लाँच डेट

अलीकडेच आलेल्या ताज्या अहवालानुसार, Samsung Galaxy F15 भारतात या महिन्यात 22 फेब्रुवारीला लाँच होऊ शकतो. होईल. लॉन्च झाल्यानंतर, फोन ई-कॉमर्स साइट Flipkart वर व्रिकीसाठी उपलब्ध करून दिला जाईल, याची देखील पुष्टी झाली आहे. फोनच्या किमतीबद्दल अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही. परंतु, सॅमसंगचे नवीन एंट्री-लेव्हल डिव्हाइस बजेट श्रेणीमध्ये येईल, असे बोलले जात आहे.

Credit: Gizmochina

Samsung Galaxy F15 चे संभावित फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

सध्या Samsung Galaxy F15 5G च्या डिस्प्लेचा आकार समोर आलेला नाही परंतु असे म्हटले जात आहे की, फोन AMOLED स्क्रीन आणि वॉटर ड्रॉप नॉच डिझाइनसह ऑफर केला जाऊ शकतो. फोनच्या प्रोसेसरबद्दल बोलायचे झाल्यास, गीकबेंच लिस्टिंगनुसार हा मीडियाटेक डायमेंसिटी 6100 प्लस चिपसेटसह लाँच केला जाण्याची शक्यता आहे. डिव्हाइसमध्ये 4GB RAM बेस मॉडेल आणि 12GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज असलेले इतर मॉडेल देखील आणले जाऊ शकतात.

लीक कॅमेरा फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा मोबाइल ब्रँडच्या जुन्या पॅटर्ननुसार ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येऊ शकतो. ज्यामध्ये 50MP प्राइमरी, 5MP अल्ट्रा वाईड अँगल आणि 2MP डेप्थ सेन्सर मिळेल. त्याबरोबरच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 13MP चा फ्रंट कॅमेरा लेन्स दिला जाऊ शकतो. बॅटरीच्या बाबतीत नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy F15 5G मध्ये 6000mAh ची दीर्घ बॅटरी दिली जाऊ शकते.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :