साऊथ कोरियाची SAMSUNG कंपनी प्रत्येक श्रेणीतील ग्राहकांसाठी स्मार्टफोन्स निर्माण करत असते. अलीकडेच कंपंनीने एक 5G फोन लाँच केला आहे. ज्यावर आता मोठ्या प्रमाणात सवलत मिळत आहे. होय, Samsung Galaxy F14 5G फोनवर सध्या मोठी सूट दिली जात आहे. या फोनवर फ्लॅट डिस्काउंटसह बँक ऑफर्स आणि इतर ऑफर्सदेखील मिळत आहेत.
Samsung Galaxy F14 5G च्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत भारतीय बाजारात 17,409 रुपये ठेवण्यात आली आहे. सध्या हा फोन फ्लिपकार्टवर 14,490 रुपयांना आहे. सध्या फोन 17% डिस्काउंटसह ऑफर केला जात आहे. बँक ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही HDFC क्रेडिट आणि डेबिट कार्डने व्यवहार केल्यास EMI वर 1,500 रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट मिळेल.
त्याबरोबरच, एक्सचेंज ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर, जुन्या फोनच्या बदल्यात तुम्हाला 13,950 रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. दोन्ही ऑफरचं लाभ तुम्हाला मिळाल्यास हा फोन 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत तुमचा होईल. सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी फ्लिपकार्टला भेट द्या.
Samsung Galaxy F14 5G चे स्पेसिफिकेशन्स Galaxy F14 5G मध्ये 90Hz रिफ्रेश रेट सपोर्ट आणि वॉटरड्रॉप-स्टाईल नॉचसह 6.6-इंच लांबीचा 1080p डिस्प्ले आहे. ही स्क्रीन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 द्वारे संरक्षित आहे. फोनच्या आत तुम्हाला Samsung चा Exynos 1330 प्रोसेसर मिळेल. स्मार्टफोनमध्ये एक्सपांडेबल स्टोरेज देण्यात आले आहे. हँडसेट Android 13 वर आधारित One UI 5.0 सॉफ्टवेअरवर चालतो आणि 2 प्रमुख OS आणि 4 वर्षांपर्यंत सुरक्षा अपडेट्स देतो.
फोटोग्राफीसाठी, F14 5G मध्ये मागे 50MP मुख्य आणि 2MP डेप्थ सेन्सरसह ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. याशिवाय, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 13MP फ्रंट कॅमेरा आहे. त्याबरोबरच, फोनमध्ये 6,000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 25W जलद चार्जिंगला समर्थन देते. ही बॅटरी संपूर्ण दोन दिवस टिकेल, असा दावा कंपनीने केला आहे.