Samsung ने Galaxy F14 5G फोन भारतात लाँच केला आहे. हा बजेट स्मार्टफोन अनेक उत्तम फीचर्सने सुसज्ज असल्याचे म्हटले जाते. डिवाइसला हाय रिझोल्युशन रिफ्रेश रेट आणि उत्तम बॅटरी आणि ड्युअल कॅमेरा सपोर्ट मिळतो. आजपासून हा फोन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात फोनची किंमत आणि लॉन्चिंग ऑफर-
हा बजेट स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनचे पहिले मॉडेल 4GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंटची किमंत 14,490 रुपये आहे. तर, दुसरे मॉडेल 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 15,990 रुपयांना उपलब्ध आहे. हा फोन दुपारी 12 वाजता FLIPKART आणि सॅमसंगच्या अधिकृत साईटवर खरेदीसाठी उपलब्ध होईल.
बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्डने EMI व्यवहार केल्यास तुम्हाला 10% म्हणजेच 1,000 रुपयांची सूट मिळू शकते. त्याचप्रमाणे, या ऑफरमध्ये IDFC FIRST बँक आणि IndusInd बँक क्रेडिट कार्ड्सवरून EMI व्यवहारांवर 10% सूट देखील मिळत आहे.
Galaxy F14 5G मध्ये 90Hz रिफ्रेश रेट सपोर्ट आणि वॉटरड्रॉप-स्टाईल नॉचसह 6.6-इंच लांबीचा 1080p डिस्प्ले आहे. ही स्क्रीन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 द्वारे संरक्षित आहे. फोनच्या आत तुम्हाला Samsung चा Exynos 1330 प्रोसेसर मिळेल. स्मार्टफोनमध्ये एक्सपांडेबल स्टोरेज देण्यात आले आहे. हँडसेट Android 13 वर आधारित One UI 5.0 सॉफ्टवेअरवर चालतो आणि 2 प्रमुख OS आणि 4 वर्षांपर्यंत सुरक्षा अपडेट्स देतो.
फोटोग्राफीसाठी, F14 5G मध्ये मागे 50MP मुख्य आणि 2MP डेप्थ सेन्सरसह ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. याशिवाय, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 13MP फ्रंट कॅमेरा आहे. त्याबरोबरच, फोनमध्ये 6,000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 25W जलद चार्जिंगला समर्थन देते. ही बॅटरी संपूर्ण दोन दिवस टिकेल, असा दावा कंपनीने केला आहे.