Samsung Galaxy F14 5G स्मार्टफोन भारतात या वर्षी मार्च महिन्यात लाँच झाला होता. लाँच झाल्यानंतर 8 महिन्यांनंतर या स्मार्टफोनची किंमत कमी करण्यात आली आहे. सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये 90Hz डिस्प्ले आहे. हा फोन Exynos 1330 प्रोसेसरने सुसज्ज आहे, ज्यामध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज उपलब्ध आहे. कपातीनंतर हा बजेट स्मार्टफोन आणखी स्वस्त झाला आहे. चला जाणून घेऊयात या सॅमसंग फोनची नवी किंमत किती?
कंपनीने Samsung Galaxy F14 5G स्मार्टफोनचा 4GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 14,990 रुपयांमध्ये लाँच केला आहे. तर, 6GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 15,990 रुपये होती. वर सांगितल्याप्रमाणे, 8 महिन्यांनंतर कंपनीने फोनची किंमत कमी केली आहे. होय, या फोनची किंमत 1,000 रुपयांनी कमी केली आहे.
आता Samsung Galaxy F14 5G चे हे व्हेरिएंट्स अनुक्रमे 13,990 आणि 14,990 रुपयांना खरेदी करता येतील. या फोनमध्ये B.A.E. पर्पल, GOAT ग्रीन आणि OMG ब्लॅक कलर पर्याय खरेदीसाठी उपलब्ध आहेत.
Samsung Galaxy F14 5G फोनमध्ये 6.6 इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले आहे. डिस्प्लेचा रीफ्रेश रेट 90Hz आहे, ज्यात कॉर्निंग गोरिला ग्लास 5 प्रोटेक्शन देखील आहे. याशिवाय, हा फोन octa-core Exynos 1330 प्रोसेसरने सुसज्ज आहे, ज्यामध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज उपलब्ध आहे.एवढेच नाही तर, फोनचे स्टोरेज मायक्रो SD कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येईल.
फोटोग्राफीसाठी, सॅमसंगच्या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP प्रायमरी कॅमेरा आहे. यात 2MP सेकंडरी कॅमेरा आणि 2MP मॅक्रो सेन्सर देखील समाविष्ट आहे. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 13MP कॅमेरा आहे. फोनला पॉवर देण्यसाठी यात 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल.