जबरदस्त फीचर्ससह Samsung Galaxy F14 फोन भारतात दाखल, किंमत 9,000 रुपयांपेक्षा कमी 

जबरदस्त फीचर्ससह Samsung Galaxy F14 फोन भारतात दाखल, किंमत 9,000 रुपयांपेक्षा कमी 
HIGHLIGHTS

Samsung Galaxy F14 4G फोन भारतीय बाजारपेठेत नुकतेच लाँच

Samsung ने नव्या स्मार्टफोनची किंमत 8,999 रुपये इतकी ठेवली आहे.

Samsung Galaxy F14 4G फोनमध्ये नाईट आणि पोर्ट्रेट मोडसारखे कॅमेरा फीचर्स देण्यात आले आहेत.

Samsung Galaxy F14 भारतीय बाजारपेठेत नुकतेच लाँच करण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा कंपनीचा बजेट स्मार्टफोन आहे. या डिव्हाइसमध्ये व्हर्च्युअल रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेज आहे, जे 1TB पर्यंत वाढवता येते. हा स्मार्टफोन तुमच्यासाठी 9,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत सादर करण्यात आला आहे. लक्षात घ्या की, कंपनीने आता Samsung Galaxy F14 स्मार्टफोन 4G कनेक्टिव्हिटीसह लाँच केला आहे.

Also Read: POCO M6 Plus 5G Sale: लेटेस्ट स्मार्टफोनची पहिली सेल आजपासून होणार सुरु, पहा किंमत आणि Best ऑफर्स

Samsung Galaxy F14 4G ची किंमत

प्रसिद्ध कोरियन ब्रँड Samsung ने Samsung Galaxy F14 सिंगल 4GB आणि 64GB स्टोरेज वेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनची किंमत 8,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हे उपकरण ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट आणि रिटेल स्टोअरमधून खरेदीसाठी उपलब्ध असेल.

Samsung Galaxy F14 4G फोन भारतीय बाजारपेठेत नुकतेच लाँच

तुमच्या माहितीसाठी सांगतो की, Samsung ने 2023 मध्ये Samsung Galaxy F14 चे 5G मॉडेल सादर केले होते. या उपकरणाची सुरुवातीची किंमत 10,990 रुपये इतकी आहे.

Samsung Galaxy F14 4G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy F14 4G फोन 6.7 इंच लांबीच्या FHD+ Infinity-U LCD डिस्प्लेसह येतो, ज्याचा रीफ्रेश रेट 90Hz आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा Snapdragon 680 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 4GB RAM आणि 64GB अंतर्गत स्टोरेज आहे, जी मायक्रो SD कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येईल. तसेच, सुरक्षिततेसाठी या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकचीही सुविधा आहे.

कॅमेरा सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, हँडसेटमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP मुख्य लेन्स, 2MP खोली आणि 2MP मॅक्रो सेन्सर आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 13MP सेंसर आहे. यामध्ये नाईट आणि पोर्ट्रेट मोडसारखे कॅमेरा फीचर्स देण्यात आले आहेत. फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 5000mAh ची मजबूत बॅटरी आहे, जी 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. कनेक्टिव्हिटीसाठी, या फोनमध्ये 4G, ड्युअल सिम, VoLTE, Wi-Fi, ब्लूटूथ, GPS, Beidou आणि USB Type-C पोर्ट आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo