Samsung Galaxy F13 22 जून रोजी भारतात लाँच होईल, बघा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy F13 22 जून रोजी भारतात लाँच होईल, बघा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
HIGHLIGHTS

Samsung Galaxy F13 भारतात लवकरच लाँच होणार

ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टद्वारे फोन विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता

हँडसेटमध्ये 'ऑटो डेटा स्विचिंग' वैशिष्ट्य देखील असेल

Samsung ने भारतात Samsung Galaxy F13 लाँच करण्याची तारीख जाहीर केली आहे. हा मिड-रेंज स्मार्टफोन 22 जून रोजी दुपारी 12 वाजता लाँच होणार आहे. सॅमसंगने या गॅलेक्सी फोनचे काही प्रमुख फीचर्स देखील उघड केले आहेत. Galaxy F13 मध्ये FHD+ LCD स्क्रीन, 6000mAh बॅटरी आणि 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. फोनच्या डिझाईनलाही पसंती मिळत आहे. चला जाणून घेऊयात Samsung Galaxy F13 चे अप्रतिम फीचर्स…

 Samsung Galaxy F13 22 जून रोजी भारतात लाँच होणार 

Flipkart वर एक मायक्रोसाइट लाइव्ह झाली आहे. ज्यामध्ये Samsung Galaxy F13चे काही प्रमुख फीचर्स आणि फोनची लाँच तारीख देखील उघड झाली आहे. मायक्रोसाइटनुसार, Samsung Galaxy F13 भारतात 22 जून रोजी दुपारी 12 वाजता लाँच होईल. स्मार्टफोनची विक्री केवळ फ्लिपकार्टद्वारे केली जाण्याची शक्यता आहे.

samsung galaxy f13

हे सुद्धा वाचा : भारीच की ! Jio चे 3 उत्कृष्ट रिचार्ज प्लॅन, प्लॅनमध्ये 30 दिवसांसाठी अमर्यादित लाभ उपलब्ध

Samsung Galaxy F13 

Samsung Galaxy F13 मध्ये FHD + LCD डिस्प्ले असेल. याशिवाय, स्मार्टफोनमध्ये 6000mAh बॅटरी असेल आणि 15W चार्जिंगला सपोर्ट करेल. हँडसेटमध्ये 'ऑटो डेटा स्विचिंग' वैशिष्ट्य देखील असेल, ज्यामुळे तुम्हाला सेकंडरी सिमद्वारे कॉल कनेक्ट आणि रिसिव्ह करता येईल आणि डेटा देखील वापरता येईल. स्मार्टफोनमध्ये 8GB RAM असेल.

samsung galaxy f13

स्मार्टफोन पूर्वी Geekbench वर आला होता, ज्यामध्ये असे दिसून आले आहे की, स्मार्टफोन Exynos 850 SoC द्वारे समर्थित असेल जो 4GB RAM सह जोडला जाईल. अशी देखील अफवा आहे की, Galaxy F13 हे रिब्रँड केलेले Galaxy M13 मॉडेल आहे.

हे खरे असल्यास, F13 मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असू शकतो. ज्यामध्ये 50MP प्रायमरी सेन्सर, 5MP अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. फोनमध्ये फ्रंटला आकर्षक सेल्फीसाठी 8MP कॅमेरा असू शकतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo