Samsung Galaxy F04 Price: या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारीमध्ये Samsung Galaxy F04 स्मार्टफोन लाँच करण्यात आला होता. हा स्मार्टफोन बजेट विभागात सादर करण्यात आला होता, त्यानंतर 6 महिन्यांतच आता कंपनीने हा स्मार्टफोन स्वस्त केला आहे. हा स्मार्टफोन 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच झाला.
Samsung Galaxy F04 स्मार्टफोन 9,499 रुपयांच्या किमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र, आता कंपनीने या फोनमध्ये संपूर्ण 1000 रुपयांची कपात केली आहे. हा स्मार्टफोन आता नव्या किमतीसह म्हणजेच 8,499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. 'Samsung इंडिया'च्या वेबसाइटवर फोनची नवीन किंमत सूचिबद्ध झाली आहे.
Samsung Galaxy F04 फोनमध्ये 6.5 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलिओ P35 प्रोसेसरसह येतो, ज्यामध्ये 4GB रॅम उपलब्ध आहे. त्याबरोबरच, फोनमध्ये 64GB स्टोरेज आहे, जे microSD कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येणार आहे.
आकर्षक फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये 13MP प्रायमरी कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सर मिळणार आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5MP फ्रंट कॅमेरा मिळतो. याव्यतिरिक्त, फोनध्ये बॅटरी 5000mAh ची आहे, जी 15W फास्ट चार्जिंगच्या समर्थनासह उपलब्ध आहे.