तारीख नोट करा ! भारतात ‘या’ दिवशी लाँच होणार स्वस्त Samsung Galaxy F04 स्मार्टफोन
Samsung Galaxy F04 स्मार्टफोन 4 जानेवारी रोजी लाँच होणार
स्मार्टफोन देशात 8000 रुपयांपेक्षा कमी किमतीत लॉन्च केला जाईल, असे म्हटले जात आहे.
Galaxy F04 मध्ये MediaTek Helio P35 प्रोसेसर दिला जाईल.
Samsung भारतात आपला नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy F04 लाँच करणार आहे. 2023 मध्ये लॉन्च होणारा दक्षिण कोरियाच्या टेक कंपनीचा हा पहिला परवडणारा फोन असेल. सॅमसंगच्या मते, Galaxy F04 भारतात दोन कलरच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करून दिला जाईल. कंपनीने डिव्हाइसच्या लाँच तारखेचीही पुष्टी केली आहे. 4 जानेवारी रोजी हा फोन 10,000 रुपयांपेक्षा कमी श्रेणीत लॉन्च होईल. बघुयात सविस्तर माहिती…
हे सुद्धा वाचा : Airtel VS BSNL : 799 रुपयांमध्ये अप्रतिम बेनिफिट्ससह कुणाचा प्लॅन आहे सर्वोत्कृष्ट?
Samsung Galaxy F04 स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy F04 मध्ये 6.51 इंच डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन HD + आहे. बजेट फोनला 60 Hz रिफ्रेश रेट देणारी स्क्रीन मिळेल. Galaxy F04 मध्ये MediaTek Helio P35 प्रोसेसर दिला जाईल. सॅमसंगने पुष्टी केली आहे की, फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली जाईल. हँडसेटला USB Type-C पोर्टद्वारे 10W चार्जिंग सपोर्ट मिळण्याची अपेक्षा आहे.
अलीकडील अहवालात दावा करण्यात आला आहे की, Galaxy F04 मध्ये 13-मेगापिक्सलचे प्रायमरी आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर असतील. फोनमध्ये 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असण्याची शक्यता आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की सॅमसंगने दिलेली माहिती आणि लीक स्पेसिफिकेशन्स पाहता, Galaxy F04 स्मार्टफोनला आधीच बाजारात असलेल्या इतर बजेट स्मार्टफोन्सना टक्कर मिळेल. Redmi A1+, Realme C31 व्यतिरिक्त, आगामी Poco C50 देखील या किमतीच्या विभागात येतो.
किंमत :
Samsung Galaxy F04 स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाईल. कंपनीने फोनच्या किमतीशी संबंधित माहितीची पुष्टीही केली आहे. फ्लिपकार्टवर बनवलेल्या टीझरनुसार, Galaxy F04 स्मार्टफोन देशात 8000 रुपयांपेक्षा कमी किमतीत लॉन्च केला जाईल. फोनला 8GB पर्यंत रॅम सपोर्ट मिळेल, ज्यामध्ये फिजिकल आणि व्हर्च्युअल दोन्ही रॅमचा समावेश आहे. सॅमसंगने या फीचरला रॅम प्लस असे नाव दिले आहे. Galaxy F04 जेड पर्पल आणि ओपल ग्रीन रंगांमध्ये उपलब्ध करून दिला जाईल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile