एकीकडे आतापर्यंत एका फोल्डेबल फोन बद्दल खूप चर्चा चालू होती, असे बोलले जात होते कि सॅमसंग गेला वर्षीच आपला फोल्डेबल फोन लॉन्च करेल, पण असे झाले नाही. हा डिवाइस अजूनतरी लॉन्चकरण्यात आलेला नाही. पण आता सॅमसंगच्या नवीन आणि आगामी सॅमसंग गॅलेक्सी F (Foldable Phone) बद्दल माहिती समोर आली आहे, तुम्हाला सांगू इच्छितो कि गेल्याच आठवड्यात झालेल्या सॅमसंग डेवलपर्स कांफ्रेंस मध्ये कंपनी ने आपला हा फोन शोकेस केला आहे. पण सर्वाना जाणून घायचे आहे कि हा कोणत्या किंमतीती लॉन्च केला जाणार आहे. याच्या किंमती बद्दल इंटरनेट वर जोरात चर्चा चालू आहे. ताज्या रिपोर्ट वर लक्ष दिल्यास या डिवाइसची किंमत दीड लाखांपेक्षा थोडी कमी असू शकते. आता आपण याबद्दल खाली सविस्तर चर्चा करणार आहोत.
हा डिवाइस एका 7.3-इंचाच्या स्क्रीन सह लॉन्च केला जाणार आहे. आधी सुरु असलेल्या काही चर्चा पाहता असे बोलले जात आहे कि हा डिवाइस जवळपास 2000 डॉलर च्या आसपास लॉन्च केला जाऊ शकतो. पण काही लोकांना वाटते कि हा 1500 डॉलर च्या आतच लॉन्च केला जाणार आहे. अशा प्रकारच्या किंमती सह नुकतेच 512GB स्टोरेज सह आपण स्मार्टफोन्स लॉन्च होताना बघितले आहेत.
असा अंदाज लावला जात आहे कि हा डिवाइस 1500-2000 डॉलर दरम्यान लॉन्च केला जाऊ शकतो. जर आता असे झाले तर तुम्ही समजूच शकता कि यूजर्स याच्या दिशेने जास्त आकर्षित होणार नाहीत. जर आपण भारतासारखा देश पहिला जिथे Xiaomi सारख्या कंपन्यांनी एका स्मार्टफोनची परिभाषा गेल्या काही वर्षांपासून बदलून टाकली आहे. तुम्हाला Xiaomi कडून भारतीय बाजारात Rs 15,000 च्या आत काही असे स्मार्टफोन्स मिळतात, जो खरंच खूप खास आहेत. पण एक फोल्डेबल फोन एक नवीन आणि यूनीक कॉन्सेप्ट आहे. अशा प्रकारचा डिवाइस याआधी क्वचितच एखाद्या मोठ्या कंपनी कडून आला आहे. ना कोणत्याही मोठ्या कंपनी ने किंवा ना ऍप्पल किंवा सॅमसंग ने फोल्डेबल फोन लॉन्च केला आहे पण अमेरिकन कंपनी ‘रोयाल फ्लेक्सपाई’ ने जगातील पहिला फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च केला आहे. याचा अर्थ असा आहे कि सॅमसंग च्या आधी जगात एक फोल्डेबल फोन आहे. या डिवाइसची किंमत 1300 डॉलर सांगण्यात आली आहे.
पण यावतिरिक्त या लिस्ट मध्ये फक्त सॅमसंग आणि ऍप्पल नाही. Huawei, Xiaomi आणि Oppo व्यतिरिक्त अनेक इतर कंपन्यां पण आहेत. असे बोलले जात आहे कि या कंपन्या पण आपला फोल्डेबल फोन लॉन्च करू शकतात. आता फक्त आपण बघितले आहे कि अनेक कंपन्या अशा प्रकारेचे स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या बोलत आहेत. पण पुढे काय होते ते बघावे लागेल कि किती कंपन्या अशा प्रकारेचे डिवाइस लॉन्च करतात ते. येत्या काळात सॅमसंग कडून सॅमसंग गॅलेक्सी S10, Galaxy S10+ आणि Galaxy S10 Lite मोबाईल फोन्स पण लॉन्च केले जाऊ शकतात. हा लॉन्च MWC 2019 मध्ये पण होऊ शकतो. पण अजून अधिकृतरित्या काहीच समोर आलेलं नाही.
आता चर्चा पुन्हा एकदा सॅमसंगच्या फोल्डेबल फोन कडे येते. कि हा डिवाइस कोणत्या किंमतीती लॉन्च केला जाऊ शकतो. आता पर्यंत बाजरात फक्त अंदाज समोर येत आहेत. हा मोबाईल फोन सॅन फ्रांसिस्को मध्ये झालेल्या सॅमसंग डेवलपर्स कांफ्रेंस मध्ये शोकेस करण्यात आला होता. हा डिवाइस या कांफ्रेंस मध्ये ब्लॅक कलरच्या कवर सह दाखवण्यात आला आहे. तसेच हा दाखवताना लाइट पण डिम करण्यात आली होती जेणेकरून डिजाईन बद्दल जास्त माहिती मिळू नये. पण कंपनी ने अजूनतरी याच्या लॉन्च डेट आणि टाइम ची माहिती दिली नाही. तसेच डिवाइसची किंमत पण समोर आलेली नाही. पण हि कोरियन पब्लिकेशन दावा करत आहे कि सॅमसंग आपला फोल्डेबल फोन मार्च किंवा मे मध्ये लॉन्च करू शकते, आणि याची किंमत जवळपास 1770 डॉलर म्हणजेच जवळपास Rs 1,29,000 असू शकते.
सूत्रांकडून मिळालेली माहिती पाहता कोरियाच्या न्यूज एजेंसी Yonhap अनुसार सॅमसंग आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन मार्च मध्ये लॉन्च करू शकते, तसेच कंपनी आपला हा डिवाइस सॅमसंग गॅलेक्सी S10 5G मॉडेल सोबत लॉन्च करू शकते. एजेंसी ने सांगितले आहे कि, “सॅमसंग आपले सॅमसंग गॅलेक्सी S10 मोबाईल फोन फेब्रुवारी मध्ये लॉन्च करू शकते, आणि पुढल्या महिन्यातच कंपनी त्यांचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन म्हणजे सॅमसंग गॅलेक्सी F मोबाईल फोन सॅमसंग गॅलेक्सी S10 च्या 5G मॉडेल सह मार्च मध्ये लॉन्च करू शकते.”
तसेच इंडस्ट्री वर लक्ष ठेऊन असणारे लोक असे पण म्हणत आहेत कि सॅमसंग आपला फोल्डेबल फोन पुढल्या वर्षी होणाऱ्या मोबाईल वर्ल्ड कांग्रेस मध्ये लॉन्च करू शकते. या मोबाईल फोनची आतुरतेने वाट बघितली जात आहे, पण असे बोलले जात आहे कि हा मोबाईल फोन 5G सपोर्ट विनाच लॉन्च केला जाणार आहे. जरी सॅमसंग कडून याची किंमत समोर आलेली नांदली तर असे बोलले जात आहे कि हा डिवाइस दीड लाखांपेक्षा थोड्या कमी किंमतीती लॉन्च केला जाऊ शकतो. आणि जर असे झाले तर या मोबाईल फोनची थेट टक्कर iPhone च्या नवीन पिढीतील मोबाईल फोन्स सोबत होईल का? तुम्हाला काय वाटते, आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये जाऊन नक्की सांगा.