हा अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. ह्या फोनमध्ये होम बटनला फिंगरप्रिंट स्कॅनरसारखे वापरु शकतो.
सॅमसंग गॅलेक्सी C5 स्मार्टफोनविषयी ह्याआधी अनेक लीक्स समोर आले आहेत. त्यामुळे अखेर ह्या कंपनीने बाजारात आपला हा नवीन स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी C5 लाँच केला. चीनमध्ये ह्या फोनची प्री-ऑर्डर बुकिंग सुरु झाली आहे. हा फोन 6 जूनपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.
गॅलेक्सी C5 स्मार्टफोन मेटल बॉडीसह लाँच केला गेला आहे. हा केवळ 6.7mm जाड आहे. ह्या फोनमध्ये 5.2 इंचाची सुपर AMOLED डिस्प्ले आहे. ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 1080 पिक्सेल आहे आणि हा अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. ह्या फोनमध्ये होम बटन फिंगरप्रिंट स्कॅनरसारखे वापरु शकतो.
ह्या फोनमध्ये १६ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन 617 ने सुसज्ज आहे. ह्यात 2600mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
गॅलेक्सी C5 एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे. ह्यात हायब्रिड स्लॉट दिला गेला आहे, ज्यात मायक्रो-एसडी कार्ड देण्यात आले आहे. फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 4G LTE, वायफाय, ब्लूटुथ आणि NFC सारखे फीचर्स दिले गेले आहे.
चीनमध्ये ह्या फोनची प्री-ऑर्डर बुकिंग सुरु झाली आहे. गॅलेक्सी C5 स्मार्टफोनच्या 32GB व्हर्जनची किंमत चीनमध्ये CNY 2,200 ($335/€300) ठेवण्यात आली आहे, तर 64GB व्हर्जनची किंमत CNY 2400 ($370/€330) आहे.