सॅमसंग ने Galaxy A9 Star आणि Galaxy A9 Star Lite स्मार्टफोंस साठी चीन मध्ये मागच्या आठवड्यात प्री-आर्डर ची प्रक्रिया सुरू केली होती. त्याचबरोबर असे पण समोर आले होते की या स्मार्टफोंस साठी ही प्रक्रिया 14 जूनला बंद केली जाईल. तसेच अधिकृतपणे हे डिवाइस 15 तारखेला सेल साठी येतील. त्याचबरोबर अधिकृतपणे या स्मार्टफोंस च्या किंमतीचा पण खुलासा झाला आहे.
किंमती बद्दल बोलायचे झाले तर असे समोर येत आहे की सॅमसंग गॅलेक्सी A9 Star स्मार्टफोन RMB 3,000 म्हणजे जवळपास Rs 30,500 च्या किंमतीत घेता येईल, त्याचबरोबर A9 Star Lite स्मार्टफोन RMB 2,000 म्हणजे जवळपास Rs 20,500 मध्ये विकत घेता येईल. तसेच Galaxy A9 Star स्मार्टफोन तुम्ही वाइट आणि ब्लॅक रंगात घेऊ शकता आणि लाइट वर्जन तुम्ही नाईट स्काई ब्लू आणि डार्क ब्लू रंगात घेऊ शकता. दोन्ही स्मार्टफोंस 15 जूनला सेल साठी येतील.
काही दिवसांपूर्वी या दोन्ही स्मार्टफोंस बद्दल एक पोस्टर लीक झाला होता. या पोस्टर वर सॅमसंग गॅलेक्सी A9 Star स्मार्टफोन बद्दल माहिती होती, तसेच यात एका वेगळ्या डिवाइस म्हणजे सॅमसंग गॅलेक्सी A9 Star Lite बद्दल पण माहिती समोर आली आहे. हे दोन्ही स्मार्टफोंस एक सारख्या डिजाईन सह लॉन्च होऊ शकतात. पण लाइट वर्जन मध्ये तुम्हाला काही हलके स्पेक्स मिळण्याची शक्यता आहे.
या डिवाइस बद्दल एक हँड्स-ऑन विडियो पण समोर आला होता, जो कालच इंटरनेट दिसला होता. या विडियो मध्ये दिसत आहे की डिवाइस एका मोठ्या डिस्प्ले सह लॉन्च केला जाऊ शकतो, असाच डिस्प्ले आपण सॅमसंग गॅलेक्सी S9+ स्मार्टफोन मध्ये बघितला आहे.
तसेच याच्या फ्रंट ला तुम्हाला एक एज-टू-एज डिस्प्ले मिळेल, पण यात नॉच नाही. फोन मध्ये तुम्हाला एक वर्टीकल ड्यूल कॅमेरा सेटअप मिळणार आहे. काही आधीच्या रिपोर्ट्स मध्ये समोर आले आहे की या डिवाइस मध्ये तुम्हाला एक 24-मेगापिक्सल आणि 16-मेगापिक्सल चे कॅमेरा सेंसर मिळू शकतात.
या डिवाइस च्या लीक स्पेक्स बद्दल बोलायचे झाले तर या डिवाइस मध्ये तुम्हाला एक 6.28-इंचाचा AMOLED डिस्प्ले 2220×1080 पिक्सल रेजोल्यूशन सह मिळणार आहे. तसेच यात एक 18.5:9 आस्पेक्ट रेश्यो वाला डिस्प्ले मिळणार आहे. फोन मध्ये तुम्हाला 4GB च्या रॅम सह 64GB ची इंटरनल स्टोरेज मिळू शकते, याव्यतिरिक्त यात एक 24-मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा असण्याची शक्यता आहे. तसेच यात एक 3,700mAh क्षमता असलेली बॅटरी पण असू शकते. हा फोन एंड्राइड Oreo सह लॉन्च केला जाऊ शकतो.