मोबाईल निर्माता कंपनी सॅमसंग लवकरच बाजारात आपला नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी A9 प्रो लाँच करणार आहे. कंपनीचा हा नवीन फोन 4GB रॅमने सुसज्ज असेल आणि हा स्मार्टफोन मागील वर्षी लाँच केल्या गेलेल्या गॅलेक्सी A9 चे नवीन व्हर्जन असेल.
ह्या फोनशी संबंधित बरीच माहिती ह्याआधी आपल्या समोर आली आहे. तसेच ह्याचे काही नवीन स्पेसिफिकेशनसुद्धा समोर आले आहेत. खरे पाहता, सॅमसंग गॅलेक्सी A9 प्रो अनटूटू बेंचमार्कवर लिस्ट झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्टीव हेमरस्टोफरने ट्विटरवर अशी माहिती दिली आहे, की बेंचमार्क वेबसाइटवर सॅमसंग गॅलेक्सी A9 प्रो चा मॉडल नंबर SM-A9100 दिला गेला आहे. हाच मॉडल नंबर भारताच्या आयात-निर्यात एक्सपोर्ट साइट जाउबावर सुद्धा लिस्ट झाला होता, जो की टेस्टिंगसाठी भारतात आला आहे. ह्याची किंमत २४,१७९ रुपये दिली गेली होती, मात्र हा प्रोटोटाइप डिवाइस आहे आणि आशा आहे की, कमर्शियल प्रकारात हा ह्यापेक्षा अधिक किंमतीत उपलब्ध होईल.
सॅमसंग गॅलेक्सी A9 प्रो स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाची पुर्ण HD डिस्प्लेने सुसज्ज असेल. ह्याचे रिझोल्युशन 1920×1080 पिक्सेल असेल. फोनमध्ये 4GB रॅम आणि 32GB चे अंतर्गत स्टोरेज उपलब्ध आहे. ह्या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 652 चिपसेटसह एड्रेनो 510 GPU दिला गेला आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम मार्शमेलोवर चालेल आणि ह्यात 16 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला आहे.
हेदेखील वाचा – हे आहेत २०,००० किंमतीत येणारे दोन उत्कृष्ट आयपॅड
हेदेखील वाचा – महिलांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे असे 5 अॅप्स