मोबाईल निर्माता कंपनी सॅमसंगने आपला नवीन फोन गॅलेक्सी A9 प्रो सादर केला आहे. सॅमसंग गॅलेक्सी A9 प्रो स्मार्टफोनला चीनमध्ये एक ऑनलाइन शॉपिंग साइटवर लिस्ट केले गेले आहे. ह्या स्मार्टफोनची किंमत 3,499 युआन (जवळपास ३५,७०० रुपये) ठरविण्यात आली आहे. सध्यातरी कंपनीकडून ह्या फोनच्या लाँच आणि किंमतीविषयी कोणतीही माहिती मिळालेली नाही.
अलीकडेच हा स्मार्टफोन सर्टिफिकेशन आणि बेंचमार्क वेबसाइटवर पाहिला गेला होता. फोनची चीनमध्ये लाँच झालेली बातमी सर्वात आधी मायड्रायव्हर्सने दिली आहे. फोन मेटल फ्रेमसह येतो. आणि ह्याला ग्लास बॉडीसह डिझाईन केला गेला आहे. सॅमसंग पे सपोर्टसह ह्या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर आहे.
सॅमसंग गॅलेक्सी A9 प्रो स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात कर्व्ह्ड ग्लाससह 6 इंचाची पुर्ण HD सुपर AMOLED डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080×1920 पिक्सेल आहे. फोनमध्ये 64 बिट ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 652 प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी एड्रेनो 510 GPU सुद्धा आहे. हा फोन 4GB रॅमने सुसज्ज आहे. ह्या फोनमध्ये 32GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले गेले आहे. ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो.
हेदेखील पाहा – Le इको ली 1S ओव्हरव्ह्यू Video
फोटोग्राफीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि वाइड सेल्फी मोड, सेल्फ-पोर्ट्रेट मोड, पाम सेल्फी मोडसह 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. हा एक ड्यूल-सिम स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर चालतो.
कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ब्लूटुथ V4.1, GPS, NFC, वायफाय आणि USB 2.0 सारखे फीचर्स दिले गेले आहे. हा फोन पांढरा आणि सोनेरी रंगात उपलब्ध आहे.
हेदेखील वाचा – एसर क्रोमबुक 14 लॅपटॉप: १४ तासांपर्यंत देणार बॅटरी लाइफ
हेदेखील वाचा – ४,००० च्या किंमतीत येणारे उत्कृष्ट पॉईंट अँड शूट कॅमेरे