सॅमसंगने आपला A-सीरिजचा नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी A9 लाँच केला आहे. ह्या स्मार्टफोनला चीनमध्ये लाँच केले गेले आहे. कंपनीने ह्या स्मार्टफोनची किंमत आणि त्याच्या उपलब्धतेविषयी कोणतीही घोषणा केली नाही. ह्या स्मार्टफोनला गॅलेक्सी A9 (2016) या नावाने चीनच्या वेबसाइटवर लिस्ट केले गेले आहे.
हा नवीन स्मार्टफोन अॅनड्रॉईड 5.1.1 लॉलीपॉपवर आधारित आहे. आणि हा अाकर्षक हार्डवेअर पॅकसह लाँच केला गेला आहे. कंपनीने अलीकडेच आपले सॅमसंग गॅलेक्सी A3 (2016), गॅलेक्सी A5 (2016) आणि गॅलेक्सी A7 (2016) लाँच केले होते.
सॅमसंग गॅलेक्सी A9 स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.5 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080×1920 पिक्सेल आहे. हा डिस्प्ले सुपर AMOLED डिस्प्ले आहे. ह्या डिस्प्लेची पिक्सेल तीव्रता आहे 401ppi. त्याचबरोबर हा स्मार्टफोन 1.8GHz ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 620 (MSM8976) प्रोसेसर, 3GB रॅम आणि अॅड्रेनो 510 ने सुसज्ज आहे. ह्यात 32GB चे अंतर्गत स्टोरेज आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डने 128GB पर्यंत वाढवता येऊ शकते.
ह्या स्मार्टफोनमध्ये १६ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. ह्यात रियर कॅमे-याने पुर्ण एचडी रिझोल्युशनचे व्हिडियो रेकॉर्ड केले जाऊ शकतात. हा अॅनड्रॉईड 5.1.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.
त्याशिवाय ह्यात 4G LTE सपोर्ट, GPS, NFC, FM रेडियो, मायक्रो-USB 2.0 आणि वायफाय फीचर आहे.