दीर्घकाळ चर्चेत राहिल्यानंतर डिस्प्ले मध्ये पंच-होल कॅमेरा सह येणारा Samsung Galaxy A8s US च्या इंस्पेक्शन एजेंसी FCC वर दिसला आहे. डिवाइसला मॉडेल नंबर SM-G8870 सह सर्टिफिकेशन मिळाले आहे. FCC डॉक्यूमेंट डॉक्यूमेंट मध्ये गॅलेक्सी A8s स्मार्टफोन दाखवण्यात आला नाही पण FCC सर्टिफिकेशन सोबत असेलला स्क्रीनशॉट दिसत आहे. स्क्रीनशॉट तुम्ही लक्ष देऊन जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल की डिस्प्लेच्या वरच्या डाव्या कॉर्नरला वाइट स्पेस देण्यात आली आहे. हि ती जागा आहे जिथे कॅमेरा साठी कट-आउट दिला जाईल.
galaxyclub.nl अनुसार डिवाइसचा आस्पेक्ट रेश्यो सॅमसंगच्या 2018 मध्ये लॉन्च झालेल्या स्मार्टफोन्स पेक्षा मोठा असेल. गॅलेक्सी A8s मध्ये 19.5: 9 आस्पेक्ट रेश्यो असलेला डिस्प्ले असू शकतो. नुकतीच एका स्क्रीन प्रोटेक्टरची इमेज समोर आली होती ज्यात टॉप लेफ्ट कॉर्नर वर कॅमेरा साठी पंच होल देण्यात आला होता. यात इयरपीस साठी छोटी जागा, बारीक बेजेल्स आणि एक चिन पण आहे. सॅमसंग ने आपल्या एनुअल डेवलपर कांफ्रेंस मध्ये चार डिस्प्लेच्या डिजाइन दाखवल्या होत्या.
सॅमसंग गॅलेक्सी A8s पहिल्यांदा ऑक्टोबर 2018 मध्ये चर्चेत आला होता. त्यावेळी कंपनीने स्मार्टफोन बद्दल जास्त माहिती दिली नव्हती पण असे सांगितले होते की हा डिवाइस “फर्स्ट-टाइम एडॉप्शन” टेक्नॉलॉजी सह येईल. डेवलपर कांफ्रेंस मध्ये कंपनीने “इनफिनिटी O” मोनिकर सह डिस्प्ले सादर केला होता जो फुल स्क्रीन पॅनल सह येईल आणि याच्या टॉप लेफ्ट कॉर्नर वर फ्रंट फेसिंग कॅमेरा साठी छोटी कट आउट दिली जाईल आणि हा 24MP मेगापिक्सलचा कॅमेरा असू शकतो.
प्रेस रेंडर नुसार, गॅलेक्सी A8s च्या बॅक वर तीन कॅमेरा दिले जातील. या तिन्ही लेंस गॅलेक्सी A7 (2018) प्रमाणे बॅक पॅनलच्या डाव्या बाजूला वर्टिकली असतील. कॅमेरा मोड्यूल मध्ये एक छोटा LED फ्लॅश आणि एलिप्टिकल फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. असे बोलले जात आहे कि Galaxy A8s मध्ये Galaxy A7 (2018) प्रमाणे कॅमेरा सेटअप असेल ज्यात 8MP 120-डिग्री अल्ट्रा वाइड लेंस, 5MP डेप्थ-सेंसिंग कॅमेरा आणि 24MP चा तिसरा कॅमेरा असेल.