Samsung Galaxy A8 Star भारतात लवकरच होऊ शकतो लॉन्च, बघा याची किंमत
Samsung Galaxy A9 Star चीन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे, तसेच हाच मॉडेल फिलिपिन्स मध्ये Galaxy A8 Star च्या स्वरूपात री-ब्रँड करण्यात आला आहे.
Samsung Galaxy A8 Star, जून मध्ये चीन मध्ये लॉन्च झालेल्या Samsung Galaxy A9 Star चाच ग्लोबल वेरीएंट असेल. हा डिवाइस लवकरच भारतात लॉन्च केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे अमेझॉन इंडिया च्या माध्यमातून या डिवाइस च्या लॉन्च बद्दल माहिती समोर आली आहे. पण आज फिलिपिन्स मध्ये हा डिवाइस लॉन्च करण्यात आला आहे.
हा डिवाइस एका नवीन नावाने चीन मध्ये पण लॉन्च करण्यात आला आहे, तिथे याची किंमत CNY 2,999 म्हणजे जवळपास Rs 30,600 आहे. या डिवाइस मध्ये तुम्हाला ड्यूल कॅमेरा सेटअप सोबत एक बेजल-लेस डिस्प्ले पण मिळत आहे. जरी भारतातील याची किंमत काय असेल हे समजले नसले तरी असे बोलले जात आहे कि या डिवाइस ची किंमत भारतात Rs 30,000 असेल.
अमेझॉन इंडिया ने यासाठी एक माइक्रो साईट पण बनवली आहे, जी Samsung Galaxy A8 Star बद्दल टीजर दाखवत आहे. पण ऑनलाइन मार्केट प्लेस मध्ये हा डिवाइस सॅमसंग स्टार नावाने लिस्ट करण्यात आला आहे. तसेच अजूनही हा डिवाइस कधी लॉन्च केला जाणार आहे याबद्दल कोणतीही माहिती समोर आली पण हा डिवाइस जवळपास Rs 30,000 च्या आसपास लॉन्च केला जाऊ शकतो हि माहिती समोर अली आहे.