Samsung Galaxy A8+ स्मार्टफोन च्या किंमतीत Rs. 2,000 ची मोठी कपात करण्यात आली आहे, त्यामुळे हा स्मार्टफोन फक्त आता Rs. 30,990 मध्ये विकत घेतला जाऊ शकतो.
भारतात हा स्मार्टफोन यावर्षी जानेवारी मध्ये लॉन्च केला गेला होता, हा स्मार्टफोन लॉन्च च्या वेळेस Rs. 32,990 मध्ये लॉन्च केले गेले होते, आणि आता Samsung Galaxy A8+ स्मार्टफोन च्या किंमतीत Rs. 2,000 ची कपात केली आहे. या स्मार्टफोन च्या किंमतीत सॅमसंग ने केलेल्या कपाती मुळे हा आता फक्त Rs. 30,990 मध्ये विकत घेतला जाऊ शकतो. तसेच सांगायची बाब म्हणजे हा स्मार्टफोनला तुम्ही एक्सक्लूसिवली अमेजॉन इंडिया वरून घेऊ शकता.
हा स्मार्टफोन सर्वात जास्त आपल्या ड्यूल कॅमेरा सेटअप साठी प्रसिद्ध आहे. या स्मार्टफोन मध्ये एक 16-मेगापिक्सल आणि 8-मेगापिक्सल चा एक ड्यूल फ्रंट कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, तसेच यात एक 16-मेगापिक्सल चा एक रियर कॅमेरा पण देण्यात आला आहे.
स्पेक्स इत्यादी बद्दल बोलायाचे झाले तर यात एक 6-इंचाचा FHD+ सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 2220×1080 पिक्सल रेजोल्यूशन सह स्मार्टफोन मध्ये देण्यात आला आहे. हा डिस्प्ले एक 18.5:9 आस्पेक्ट रेश्यो वाला आहे. स्मार्टफोन मध्ये Exynos 7885 ओक्टा-कोर प्रोसेसर, 6GB ची रॅम 64GB ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच या स्मार्टफोन मध्ये एक हाइब्रिड माइक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. ज्याने तुम्ही स्टोरेज जवळपास 256GB पर्यंत वाढवता येईल.
फोन मध्ये एक 3500mAh क्षमता असलेली बॅटरी आहे, तसेच स्मार्टफोन ड्यूल-सिम कार्ड स्लॉट्स सह येतो. यात तुम्हाला 4G LTE सह VoLTE HD वॉईस कॉलिंग सपोर्ट पण देतो. स्मार्टफोन एंड्राइड 7.1.1 नुगट वर चालतो.