मोबाईल निर्माता कंपनी सॅमसंग लवकरच बाजारात आपला नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी A8 चे नवीन व्हर्जन लाँच करणार आहे. ह्याच वर्षी कंपनीने गॅलेक्सी A8 ला लाँच केले होते आणि आता कंपनी नवीन व्हर्जन आणण्याच्या तयारीत आहे.
सध्यातरी सॅमसंग गॅलेक्सी A8 नवीन व्हर्जनची काही माहिती समोर आली आहे. खरे पाहता, ह्या स्मार्टफोनला एका नवीन सर्टिफिकेशन साइटवर लिस्ट केले गेले आहे. FCC वर ह्याला A3LSCP32 आयडीने लिस्ट केले गेले आहे. सध्यातरी जो गॅलेक्सी A8 मॉडेल आहे, तो A3LSMA800S नावाने उपलब्ध आहे.
सॅमसंग गॅलेक्सी A8 2016 ला एक्सनोस ७४२० चिपसेटसह लाँच केले जाईल. हेच चिपसेट गॅलेक्सी नोट 5 आणि गॅलेक्सी S6 मध्येही पाहायला मिळाले होते.
त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये ३०५०mAh ची बॅटरी दिली गेली जाऊ शकते. ह्या स्मार्टफोनमध्ये 5.7 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले असू शकते. हा अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 5.1 लॉलीपॉपवर चालेल.
ह्या स्मार्टफोनला GFX डेटाबेसवरसुद्धा पाहिले गेले आहे. ह्यात सॅमसंगचे ऑक्टाकोर प्रोसेसर आणि माली T760 GPU असण्याची शक्यता आहे. त्याशिवाय ह्यात 2GB रॅम आणि 32GB चेे अंतर्गत स्टोरेज असल्याचा दावा केला आहे. तथापि, जीएफएक्सबेंच डेटाबेसमध्ये फोनच्या स्क्रीनचा आकार ५.२ इंच इतका आहे आणि त्याचे पिक्सेल रिझोल्युशन 1080p आहे.
अशी आशा आहे की, सॅमसंग गॅलेक्सी A8 च्या या नवीन व्हर्जनमध्ये १६ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा असू शकतो. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात 3G शिवाय 4G, वायफाय आणि ब्लूटुथसुद्धा उपलब्ध आहे.