नवीन Samsung Galaxy A7 (2018) आणि Galaxy A9 (2018) च्या किंमती झाल्या कमी

Updated on 15-Jan-2019
HIGHLIGHTS

Samsung च्या Galaxy A7 (2018) आणि Galaxy A9 (2018) च्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत आणि आता हे दोन्ही लेटेस्ट स्मार्टफोन्स कमी किंमतीती विकत घेता येतील.

महत्वाचे मुद्दे

  • Samsung Galaxy A7 (2018) आणि Galaxy A9 (2018) च्या किंमती पडल्या
  • Galaxy A7 ची बेस किंमत झाली Rs 18,990
  • Galaxy A9 ची बेस किंमत झाली Rs 33,990

Samsung ने भारतात आपल्या Galaxy A7 (2018) आणि Galaxy A9 (2018) स्मार्टफोन्सच्या किंमतीवर डिस्काउंटची घोषणा केली आहे. ऑफलाइन रिटेलर महेश टेलिकॉम ने ट्वीटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे कि नवीन हॅंडसेट्स डिस्काउंटड किंमतीती विकले जात आहेत. Samsung Galaxy A7 स्मार्टफोनचा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंट Rs 18,990 मध्ये विकला जात आहे जो डिवाइस Rs 23,990 मध्ये लॉन्च केला गेला होता. या डिवाइसच्या 6GB रॅम मॉडेल बद्दल बोलायचे तर हा Rs 28,990 मध्ये लॉन्च केला गेला होता आणि आता हा डिवाइस Rs 22,990 मध्ये विकत घेता येईल. Galaxy A9 पाहता या स्मार्टफोनचे 6GB रॅम आणि 8GB रॅम वेरिएंट क्रमश: Rs 36,990 आणि Rs 39,990 मध्ये लॉन्च केले गेले होते पण आता 6GB रॅम वेरिएंट Rs 33,990 आणि 8GB रॅम वेरिएंट Rs 36,990 मध्ये उपलब्ध आहे.

Samsung Galaxy A9 (2018) चे स्पेसिफिकेशन्स

सॅमसंग गॅलेक्सी A9 (2018) मोबाइल फोन बद्दल बोलायचे तर हा स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट सह लॉन्च केला गेला आहे, हा 2.2GHz च्या क्लॉक स्पीड वर चालतो. या मोबाइल फोन मध्ये तुम्हाला एक 6.3-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले 18:9 आस्पेक्ट रेश्यो सह देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये तुम्हाला एक 3800mAh क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे. जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोन एंड्राइड 8.0 Oreo वर चालतो, त्याचबरोबर यात तुम्हाला एक रियर माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर पण मिळत आहे.

कॅमेरा इत्यादी बद्दल बोलायचे तर या मोबाइल फोन मध्ये म्हणजे सॅमसंग गॅलेक्सी ए9 मध्ये तुम्हाला चार रियर कॅमेरा मिळत आहेत. जे वर्टीकली देण्यात आले आहेत. फोन मध्ये तुम्हाला एक 24-मेगापिक्सलचा मेन कॅमेरा  f/1.7 अपर्चर लेन्स सह मिळत आहे, एक 8-मेगापिक्सलचा कॅमेरा f/2.4,120-डिग्री अल्ट्रा वाईड लेंस सह मिळत आहे, एक 10-मेगापिक्सलचा सेंसर f/2.4 टेलीफोटो कॅमेरा, 2X ऑप्टिकल झूम सह मिळत आहे आणि एक 5-मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा f/2.2 अपर्चर सह मिळत आहे. पण फोनच्या फ्रंटला तुम्हाला एक 24-मेगापिक्सलचा कॅमेरा f/2.0 अपर्चर सह मिळत आहे.  

Samsung Galaxy A7 की स्पेसिफिकेशन्स

गॅलेक्सी A7 ची खासियत याची ट्रिपल रियर कॅमेरा सिस्टम आहे. हा सॅमसंगचा पहिला फोन आहे जो ट्रिपल कॅमेरा सिस्टम सह आला आहे. फोनच्या मागे 24 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 8 मेगापिक्सलचा दूसरा सेंसर (जो अल्ट्रा-वाइड लेंस सह येतो) तसेच तीसरा 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे. सेल्फी आणि विडियो कॉलिंग साठी डिवाइसच्या फ्रंटला 24 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

Galaxy A7 मध्ये 6 इंचाचा FHD+ सुवर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचे रेजोल्यूशन 1080×2220 पिक्सल आहे आणि याचा आस्पेक्ट रेश्यो 18.5:9 आहे. तसेच डिवाइस 2.2GHz एक्सिनोस 7885 ओक्टा-कोर CPU सह येतो आणि स्टोरेज माइक्रो एसडी कार्ड च्या मदतीने 512GB पर्यंत वाढवता येते.

स्मार्टफोन मध्ये 3,300mAh ची बॅटरी देण्यात आली आहे आणि सिक्योरिटी साठी डिवाइस मध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आहे. तसेच डिवाइस एंड्राइड 8.0 ओरियो वर चालतो.

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :