Samsung ने Samsung Galaxy A55 आणि Galaxy A35 काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात आले होते. दोन्ही नवीन A-सिरीजचे मोबाईल फोन आहेत. मात्र, लाँचच्या वेळी कंपनीने या फोनची किंमत जाहीर केली नव्हती. आता स्मार्टफोन ब्रँड सॅमसंगने दोन्ही स्मार्टफोनची किंमत जाहीर केली आहे. दोन्ही फोन अधिकृत वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. लक्षात घ्या की, बाजारात Vivo, Oppo आणि Xiaomi सारख्या कंपन्यांच्या हँडसेटला जबरदस्त स्पर्धा मिळणार आहे.
Samsung Galaxy A55 च्या 8GB + 128GB स्टोरेजची किंमत 39,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. फोनचा 8GB + 256GB स्टोरेज व्हेरिएंट 42,999 रुपयांना आणि 12GB + 256GB स्टोरेज मॉडेल 45,999 रुपयांना उपलब्ध आहे. तर दुसरीकडे, Samsung Galaxy A35 चे 8GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 30,999 रुपये आहे. आणि 8GB + 256GB स्टोरेज मॉडेल 33,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. हे दोन्ही मोबाईल फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी केले जाऊ शकतात.
Samsung Galaxy A55 5G फोनमध्ये 6.6 इंच लांबीचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. यामध्ये Exynos 1480 octa-core प्रोसेसर उपलब्ध आहे. फोटोग्राफीसाठी, Samsung Galaxy A55 5G फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 50MP प्रायमरी कॅमेरा, 12MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 5MP मॅक्रो सेन्सर उपलब्ध आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा आहे. Galaxy A55 ची बॅटरी 5000mAh आहे, ज्याला 25W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे.
Samsung Galaxy A35 5G फोनमध्ये 6.6 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. फोनमध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, यात Exynos 1380 चिपसेट आणि Mali-G68 MP5 GPU आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. या फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, फोनमध्ये 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 5MP मॅक्रो सेन्सर उपलब्ध आहे. तसेच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 13MP फ्रंट कॅमेरा आहे. त्याबरोबरच, यात 25W जलद चार्जिंगला सपोर्ट करणारी मजबूत 5000mAh बॅटरी आहे. त्याच वेळी, हे डिव्हाइस फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉक वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे.