अरे व्वा! Samsung Galaxy A55 5G आणि Galaxy A35 5G भारतात सादर, जाणून घ्या फीचर्स। Tech News

Updated on 11-Mar-2024
HIGHLIGHTS

Samsung Galaxy A55 5G आणि Samsung Galaxy A35 5G स्मार्टफोन भारतात सादर

Samsung इंडिया आणि Amazon इंडियाच्या माध्यमातून हे फोन खरेदी करता येतील.

दोन्ही फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

Samsung ने Samsung Galaxy A55 5G आणि Samsung Galaxy A35 5G स्मार्टफोन भारतात सादर केले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीच्या Samsung Galaxy A सीरीजची ही नवीनतम आवृत्ती आहे. दोन्ही फोन मोठ्या प्रमाणात समान फीचर्ससह येतात. सध्या तरी कंपनीने या दोन्ही फोनची किंमत जाहीर केलेली नाही. दोन्ही फोनची किंमत 14 मार्च रोजी दुपारी 12 वाजता समोर येईल. फोन आइस ब्लू, लेमन, लिलाक आणि नेव्ही हे कलर ऑप्शन्स आहेत.

दरम्यान, उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, Samsung इंडिया आणि Amazon इंडियाच्या माध्यमातून हे फोन खरेदी करता येतील. चला तर मग जाणून घेऊयात Samsung Galaxy A55 5G आणि Galaxy A35 5G चे सर्व तपशील-

हे सुद्धा वाचा: आगामी Realme Narzo 70 Pro 5G ची भारतीय लाँच डेट जाहीर, ‘या’ दिवशी होणार जबरदस्त एंट्री। Tech News

Samsung Galaxy A55 5G

Samsung Galaxy A55 5G

Samsung Galaxy A55 5G फोनमध्ये 6.6-इंच लांबीचा FHD+ AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. या फोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज आहे. फोटोग्राफीसाठी, Samsung Galaxy A55 5G फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 50MP प्राथमिक कॅमेरा, 12MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 5MP मॅक्रो सेन्सर उपलब्ध आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आहे.

Samsung Galaxy A35 5G

Samsung Galaxy A35 5G फोनमध्ये 6.6 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. या फोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज आहे. तर, फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देखील आहे. यात 50MP प्रायमरी सोबत, फोनमध्ये 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 5MP मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 13MP फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :