सॅमसंग गॅलेक्सी A5 आणि गॅलेक्सी A7 स्मार्टफोन्सचे फोटो झाले लीक
ह्या फोटोंमध्ये गोल्डन रंगात गॅलेक्सी A5 सह आणि काळ्या रंगात गॅलेक्सी A7 दिसत आहे. फोटोंमध्ये गॅलेक्सी A5 आणि गॅलेक्सी A7 च्या नवीनतम व्हर्जन ग्लास बॅक पॅनलसह असेल असे दिसत आहे.
मोबाईल निर्माता कंपनी सॅमसंगच्या दोन नवीन स्मार्टफोनचे फोटो लीक झाले आहेत. खरे पाहता, सॅमसंग गॅलेक्सी A5 आणि गॅलेक्सी A7 स्मार्टफोनच्या नवीनतम व्हर्जनचे फोटो समोर आले आहेत. ह्याआधी मागील आठवड्यात सॅमसंग गॅलेक्सी A3 आणि गॅलेक्सी A5 च्या जनरेशनचे फोटो समोर आले होते.
हे फोटो चीनी पब्लिकेशन आनझुओने प्रसिद्ध केले आहेत. ह्या फोटोत गोल्डन रंगात गॅलेक्सी A5 सह आणि काळ्या रंगात गॅलेक्सी A7 दिसत आहे. फोटोंमध्ये गॅलेक्सी A5 आणि गॅलेक्सी A7 च्या नवीनतम व्हर्जन ग्लास बॅक पॅनलसह असेल असे दिसत आहे.
सॅमसंग गॅलेक्सी A5 स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.2 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे. ह्यात 1.6GHz ऑक्टा-कोर सॅमसंग एक्सीनॉस 7 प्रोसेसर आणि 2GB रॅम असण्याची शक्यता आहे. हा 16GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. स्मार्टफोनमध्ये LED फ्लॅशसह 12 मेगापिक्सेल रियर कॅमेरा आणि 4.7 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा असण्याचा दावा केला आहे.
तर गॅलेक्सी A7 (2016 एडिशन) वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, हा अॅनड्रॉईड 5.1.1 लॉलीपॉप दिला आहे. ह्यात 5.2 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले असेल. हा 1.6GHz ऑक्टा-कोर एक्सीनोस 7 प्रोसेसरने सुसज्ज असेल. त्याशिवाय ह्यात 2GBची रॅम असू शकते. त्याशिवाय तपशीलामध्ये 16GB चे अंतर्गत स्टोरेज, १२ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ४.७ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा असेल.
Digit NewsDesk
Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile