Samsung लव्हर्ससाठी मोठी खुशखबर आहे, कंपनीने अलीकडेच लाँच झालेल्या स्मार्टफोनच्या किमतीत घट केली आहे. Samsung Galaxy A34 5G आणि Galaxy A54 5G स्मार्टफोन मार्च महिन्यात लाँच करण्यात आले होते. 6 महिन्यांनंतर आता कंपनीने या स्मार्टफोन्सवर एक उत्तम डिस्काउंट ऑफर आणली आहे, ज्यामध्ये या दोन्ही स्मार्टफोन्सच्या किंमतीत कमालीची घट झाली आहे. या स्मार्टफोन्सवर उपलब्ध असलेल्या डिस्काउंट ऑफर्सवर एक नजर घालुयात.
कंपनीने Samsung Galaxy A34 5G स्मार्टफोन 30,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर Samsung Galaxy A34 5G फोन आता फक्त 26,999 रुपयांमध्ये कंपनीच्या साइटवर सूचिबद्ध झाला आहे. यामध्ये ICICI बँक कार्डसह 2000 रुपये इन्स्टंट कॅशबॅक आणि SBI कार्डसह 2000 रुपये अतिरिक्त बँक ऑफर समाविष्ट आहेत.
दुसरीकडे, Samsung Galaxy A54 5G स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 38,999 रुपये आहे. तुम्ही Samsung Galaxy A54 5G स्मार्टफोन 33,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत घरी आणू शकता. मात्र, ही ऑफर मर्यादित कालावधीपर्यंत असणार आहे, काही दिवसांनंतर किंमत परत आपल्या मूळ किमतीवर परत जाणार आहे.
Samsung Galaxy A34 5G स्मार्टफोनमध्ये 6.6-इंच लांबीचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. फोन ऑक्टा-कोर डायमेंसिटी 1080 प्रोसेसरने सुसज्ज आहे. MediaTek ने त्याच्या 1080 प्रोसेसरला वापरकर्त्यासाठी अधिक वापरण्यायोग्य बनवून अनेक मार्गांनी चालना दिली आहे. त्याचा कॅमेरा वापर, उत्तम गेमिंग आणि स्ट्रीमिंग अनुभव मिळेल. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 48MP प्रायमरी कॅमेरा OIS सपोर्टसह देण्यात आला आहे. तर, 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 5MP मॅक्रो सेन्सर समाविष्ट आहे. फोनची बॅटरी 5000mAh आहे, ज्यामध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल.
Samsung Galaxy A54 5G स्मार्टफोनमध्ये 6.4-इंच लांबीचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा 120Hz चा रिफ्रेश दर देखील आहे. याशिवाय हा फोन ऑक्टा-कोर Exynos 1380 चिपसेट सह येतो. Exynos 1380 अंदाजे 20% वेगवान गेम लोडिंग 30% शक्तिशाली मल्टी-कोर कार्यप्रदर्शन प्रदान करण्यासाठी उत्तम चिपसेट आहे. फोटोग्राफीसाठी, या सॅमसंग फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देखील आहे, ज्यामध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा, 12MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 5MP मॅक्रो सेन्सरचा समावेश आहे. फोनची बॅटरी 5000mAh आहे, ज्यामध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.