Samsung च्या Best Seller स्मार्टफोनच्या किमतीत प्रचंड मोठी कपात, जाणून घ्या नवी किंमत। Tech News 

Samsung च्या Best Seller स्मार्टफोनच्या किमतीत प्रचंड मोठी कपात, जाणून घ्या नवी किंमत। Tech News 
HIGHLIGHTS

Samsung Galaxy A34 स्मार्टफोनच्या किमतीत मोठी कपात

कंपनीने हा स्मार्टफोन मिड बजेट रेंजमध्ये लाँच केला होता.

Samsung Galaxy A34 स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.

Samsung चा बेस्ट सेलर स्मार्टफोन Samsung Galaxy A34 स्वस्त झाला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन यावर्षी म्हणजेच मार्च 2023 मध्ये लाँच केला होता. आता 9 महिन्यांनंतर कंपनीने फोनची किंमत अगदी कमी केली आहे. कंपनीने हा स्मार्टफोन मिड बजेट रेंजमध्ये लाँच केला होता. या स्मार्टफोनच्या किमतीत आता 2 हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. जर तुम्हाला हा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर, आता हा फोन स्वस्तात मिळेल. बघुयात सविस्तर-

हे सुद्धा वाचा: Good News! लेटेस्ट OnePlus Nord 3 5G फोन झाला 4,000 रुपयांनी स्वस्त, नवीन किंमत साइटवर Live। Tech News

Samsung Galaxy A34 5G ची नवी किंमत

samsung galaxy a34 5g price cut
samsung galaxy a34 5g

कंपनीने Samsung Galaxy A34 स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये लाँच केला आहे. स्मार्टफोनच्या 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 30,999 रुपये आहे. तर, 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 32,999 रुपये आहे. मात्र, वर सांगितल्याप्रमाणे आता कंपनीने हा फोन 2000 रुपयांनी स्वस्त केला आहे. या कपातीनंतर फोन अनुक्रमे 28,999 रुपये आणि 30,999 रुपये इतकी झाली आहे. या फोनमध्ये लाइट ग्रीन, ब्लॅक, सिल्व्हर आणि लाइट व्हायलेट कलर ऑप्शन्स मिळतील.

Samsung Galaxy A34 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A34 फोनमध्ये 6.6 इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. याशिवाय, हा फोन MediaTek Dimensity 1080 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. यासह तुम्हाला उत्तम कार्यप्रदर्शन, रॅपिड App रिस्पॉन्स आणि गेमिंगसाठी स्मूथ परफॉर्मन्स मिळेल. यासह फोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे. पाण्यापासून संरक्षणासाठी फोनला IP67 रेटिंग देखील देण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप डोनेट आला. यामध्ये तुम्हाला 48MP चा प्रायमरी कॅमेरा मिळेल. त्याबरोबरच, 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 5MP मॅक्रो सेन्सर मिळणार आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 13MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. फोनला पॉवर देण्यासाठी फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo