मोबाईल निर्माता कंपनी सॅमसंगचे तीन स्मार्टफोन्स गॅलेक्सी A3, गॅलेक्सी A5 आणि गॅलेक्सी A7 चे नवीन व्हर्जन विक्रीसाठी उपलब्ध होतील. गॅलेक्सी A3 (2016), गॅलेक्सी A5 (2016) आणि गॅलेक्सी A7 (2016) स्मार्टफोन्स डिसेंबरपासून चीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होतील. त्यानंतर कंपनी लवकरच ह्या तीन स्मार्टफोन्सला दुस-या देशांमध्ये सुद्धा उपलब्ध करेल. कंपनीने अधिकृतरित्या ह्याबाबत माहिती दिली आहे.
त्याचबरोबर डचच्या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट स्मार्टफोनशॉपवर गॅलेक्सी A3 (2016) आणि गॅलेक्सी A5 (2016) ची प्री-ऑर्डर बुकिंग केली जाऊ शकते. रिटेलरद्वारा ह्यांच्यासोबत एक्सपेक्टेड तिथिसुद्धा लिहिलेली आहे, जी ८ जानेवारी दिली गेली आहे. ह्या रिटेलर साइटवर सॅमसंग गॅलेक्सी A5 ची किंमत युरो ४२९ आणि गॅलेक्सी A3 ची किंमत युरो ३२९ दिली गेली आहे.
तिन्ही स्मार्टफोन्स मेटल-क्लेडने बनलेले आहे आणि तिन्ही स्मार्टफोन्स अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपसह ड्यूल-सिम सपोर्ट करतात.
सॅमसंग गॅलेक्स A7 च्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाची FHD 1080×1920 पिक्सेल रिझोल्युशनची सुपर AMOLED डिस्प्ले दिली गेली आहे. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर जो 1.6Ghz चा स्पीड दिला गेला आहे आणि ह्यात 3GB ची रॅमसुद्धा दिली गेली आहे. स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी 13MP रियर कॅमेरा LED फ्लॅशसह ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशनसह येतो. त्याचबरोबर ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. दोन्ही कॅमे-यामध्ये f/1.9 अॅपर्चर लेंससह येतात. स्मार्टफोनमध्ये 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला आपण मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात पर्यायांमध्ये बरेच काही दिले आहे. स्मार्टफोनमध्ये 3300mAh क्षमतेची बॅटरीसुद्धा दिली गेली आहे.
तर गॅलेक्सी A5 स्मार्टफोनचे काही बदल सोडले तर, ह्या स्मार्टफोनची इतर सर्व वैशिष्ट्ये गॅलेक्सी A7 सारखेच आहे. ह्यात ५.२ इंचाची FHD सुपर AMOLED डिस्प्ले, 2GB रॅम आणि 2900mAh क्षमतेची बॅटरी फास्ट चार्जिंगसह दिली गेली आहे.
तर सॅमसंग गॅलेक्सी A3 स्मार्टफोनमध्ये ४.७ इंचाची HD 720×1280 पिक्सेल रिझोल्युशनची सुपर AMOLED डिस्प्ले, 1.5GHz क्वाड-कोर प्रोसेसर, 1.5GB रॅम आणि 2300mAh क्षमतेची मोठी बॅटरी दिली गेली आहे. त्याचबरोबर हा इतर दोन्ही स्मार्टफोन्सपेक्षा थोडा जास्त कॉम्पॅक्ट दिसून येतो.