Samsung Galaxy A26 5G
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung ने या महिन्याच्या सुरुवातीला Samsung Galaxy A26 5G चे अनावरण केले. त्यानंतर, आता Samsung ने हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. हा फोन 25,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत म्हणजे मिड बजेटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये सॅमसंगच्या प्रीमियम फोनप्रमाणे फीचर्स मिळत आहेत. विशेष फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये सर्कल टू सर्च आणि IP67 रेटिंग मिळेल. जाणून घेऊयात Samsung Galaxy A26 5G ची किंमत आणि संपूर्ण तपशील-
Also Read: Motorola Edge 60 Fusion ‘या’ दिवशी भारतात होणार दाखल! आगामी फोन आकर्षक फीचर्सने सज्ज
Samsung ने प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart द्वारे Samsung Galaxy A26 5G ची किंमत जाहीर केली आहे. Samsung Galaxy A26 हा फोन 8GB + 128GB आणि 8GB + 256GB स्टोरेज अशा दोन स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. अनुक्रमे या फोनची किंमत 24,999 रुपये आणि 27,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. फोन Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध आहे.
Samsung Galaxy A26 या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच लांबीचा FHD+ Infinity-U सुपर AMOLED डिस्प्ले आहे. या डिस्प्लेवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस+ बसवले आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. सुरळीत काम करण्यासाठी, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या स्मार्टफोनमध्ये Exynos 1380 प्रोसेसर देण्यात आला आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज आहे, जे SD कार्डच्या मदतीने 2TB पर्यंत वाढवता येते.
याव्यतिरिक्त, Samsung Galaxy A26 5G मध्ये फोटो काढण्यासाठी आणि व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP चा मुख्य लेन्स, 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो लेन्स आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 13MP कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी, या स्मार्टफोनमध्ये 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली 5000mAh ची मोठी बॅटरी आहे.