Its Here! Samsung Galaxy A25 आणि A15 5G भारतात लाँच, तुमच्या बजेटमध्ये बसेल का नवीन फोन? बघा किंमत। Tech News 

Its Here! Samsung Galaxy A25 आणि A15 5G भारतात लाँच, तुमच्या बजेटमध्ये बसेल का नवीन फोन? बघा किंमत। Tech News 
HIGHLIGHTS

Samsung Galaxy A25 5G आणि Samsung Galaxy A15 5G स्मार्टफोन भारतात लाँच

हे दोन्ही स्मार्टफोन्स मिड बजेट रेंजमध्ये सादर करण्यात आले आहेत.

फोनमध्ये Samsung Exynos 1280 octacore प्रोसेसर उपलब्ध आहे.

Samsung ने दोन नवीन 5G स्मार्टफोन लाँच केले आहेत. यासह कंपनीने त्यांच्या A-सिरीजच्या स्मार्टफोन पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे. Samsung चे नवे स्मार्टफोन्स Samsung Galaxy A25 5G आणि Samsung Galaxy A15 5G हे होत. हे स्मार्टफोन्स मिड बजेट रेंजमध्ये सादर करण्यात आले आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Samsung Galaxy A25 5G आणि Samsung Galaxy A15 5G स्मार्टफोनबद्दल सांगणार आहोत. बघुयात या फोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स.

Samsung Galaxy A25 5G ची किंमत

Samsung ने Samsung Galaxy A25 5G फोन मिड बजेट रेंजमध्ये सादर केला आहे. हा फोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. डिव्हाइसच्या 8GB रॅम + 128GB वेरिएंटची किंमत 26,999 रुपये ठेवण्यात आली आहे. मोबाईलच्या 8GB RAM + 256 GB मॉडेलची किंमत 29,999 रुपये आहे. लाँच ऑफरअंतर्गत तुम्हाला हा स्मार्टफोन ऑफरसह मिळेल.

SAMSUNG GALAXY A25 5G

Samsung Galaxy A15 5G ची किंमत

Samsung Galaxy A15 5G स्मार्टफोनच्या 8GB रॅम + 128GB व्हेरिएंटची किंमत 19,499 रुपये ठेवण्यात आली आहे. तर, फोनचे टॉप मॉडेल 8GB RAM + 256 GB स्टोरेज, 22,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आले आहे.

Samsung Galaxy A25 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A25 5G फोनमध्ये 6.5-इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले आहे. जो वॉटरड्रॉप नॉच स्क्रीन, सुपर AMOLED पॅनेल आणि 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. फोनमध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी Samsung Exynos 1280 octacore प्रोसेसर देण्यात आला आहे. वर सांगितल्याप्रमाणे, फोनमध्ये 8GB RAM + 128GB स्टोरेज आणि 8GB RAM + 256GB मॉडेल समाविष्ट आहेत. सिक्योरिटीसाठी फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, फेस अनलॉक फीचर देखील देण्यात आले आहे.

फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये LED फ्लॅश, OIS सह F/1.8 अपर्चरसह 50MP चा प्रायमरी सेन्सर, 8MP ची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2MP डेप्थ सेन्सर उपलब्ध आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 13MP चा फ्रंट कॅमेरा आहे. तर, पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 25W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह उपलब्ध आहे.

SAMSUNG GALAXY A15 5G

Samsung Galaxy A15 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

फोनमध्ये 6.5 इंच लांबीचा फुल HD प्लस इन्फिनिटी यू नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. यासह वापरकर्त्यांना 90Hz रिफ्रेश रेट मिळेल. फोनमध्ये डायमेन्सिटी 6100+ चिपसेट देण्यात आला आहे, जो वापरकर्त्यांना गेमिंग तसेच इतर सर्व ऑपरेशन्ससाठी उत्तम अनुभव देईल. सिक्योरिटीसाठी फोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळणार आहे.

याव्यतिरिक्त, हा डिव्हाइस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह सुसज्ज आहे, ज्यामध्ये वापरकर्त्यांना 50MP प्रायमरी कॅमेरा लेन्स, 5MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 2MP डेप्थ सेन्सर मिळेल. तर, स्मार्टफोनमध्ये 13MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, फोंम्हद्ये 5000mAh बॅटरी आहे. यासह, डिव्हाइसला 25W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान देण्यात आले आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo