अलीकडेच Samsung चे लेटेस्ट स्मार्टफोन्स Samsung Galaxy A15 5G आणि Galaxy A25 5G स्मार्टफोन पूर्वी 21 डिसेंबर रोजी भारतात लाँच होणार होते. मात्र, आता कंपनीने दोन्ही फोनच्या लाँच डेटमध्ये बदल केला आहे. कंपनीने नवीनतम प्रेस रिलीजद्वारे फोनची नवीन लाँच डेट उघड केली आहे. लक्षात घ्या की, कंपनीचे हे दोन्ही फोन्स मिड-रेंजचे असणार आहेत. हे दोन्ही फोन भारतापूर्वीच जागतिक बाजारपेठेत लाँच करण्यात आले आहेत. चला तर मग बघुयात हे स्मार्टफोन्स भारतात कधी होणार दाखल?
वर सांगितल्याप्रमाणे, याआधी कंपनीने X म्हणजेच Twitter प्लॅटफॉर्मवर या दोन फोनची लाँच डेट जाहीर केली होती. त्यानंतर असे सांगण्यात आले की, हे दोन्ही फोन 21 डिसेंबरला म्हणजेच गुरुवारी लाँच केले जातील. मात्र, काल गुरुवारी कंपनीने फोनची नवीन लाँच डेट जाहीर केली आहे. कंपनीने नवीनतम प्रेस रिलीजद्वारे Samsung Galaxy A15 5G आणि Galaxy A25 5G स्मार्टफोन्सच्या लाँच डेटची पुष्टी केली आहे. त्यानुसार, हे दोन्ही स्मार्टफोन 26 डिसेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता भारतात लाँच केले जातील.
Samsung Galaxy A15 5G आणि Galaxy A25 5G स्मार्टफोन्स आधीच जागतिक स्तरावर लाँच करण्यात आले आहेत. त्यानुसार भारतात लाँच होणाऱ्या फोनचे फीचर आणि स्पेसिफिकेशन्सदेखील ग्लोबल व्हेरिएंटसारखेच असतील, अशी अपेक्षा आहे.
दोन्ही फोनमध्ये 6.5 इंच लांबीचा सुपर AMOLED डिस्प्ले असू शकतो. A15 5G मॉडेल 90Hz रिफ्रेश रेटसह दाखल होईल. तर, A25 5G स्मार्टफोन 120Hz च्या रिफ्रेश रेटसह मिळण्याची शक्यता आहे.
Samsung Galaxy A15 5G मॉडेल MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसरने सुसज्ज असेल. तर, Samsung Galaxy A25 5G फोन Exynos 1280 प्रोसेसरने सुसज्ज असेल.
फोटोग्राफीसाठी, दोन्ही फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. Samsung Galaxy A25 5G फोनबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 50MP प्राइमरी, 8MP अल्ट्रा-वाइड आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. तर, Samsung Galaxy A15 5G फोनमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा, 5MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2MP डेप्थ सेन्सरचा समावेश असेल.
फोनला पॉवर देण्यासाठी दोन्ही फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली जाईल, ज्यासह 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध असेल. यासह, तुम्ही हा फोन काही बेसिक कार्यांसह दोन दिवस चालण्याची क्षमता ठेवेल.