digit zero1 awards

Samsung Galaxy A25 आणि Galaxy A15 5G च्या भारतीय लाँच डेट Confirm! बजेटमध्ये बसतील का फोन? Tech News 

Samsung Galaxy A25 आणि Galaxy A15 5G च्या भारतीय लाँच डेट Confirm! बजेटमध्ये बसतील का फोन? Tech News 
HIGHLIGHTS

Samsung Galaxy A25 आणि Samsung Galaxy A15 5G स्मार्टफोन नुकतेच ग्लोबली लाँच

Samsung च्या या दोन्ही स्मार्टफोन्सच्या भारतीय लाँच डेटची पुष्टी

हे दोन्ही फोन 21 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 12:30 वाजता भारतात लाँच होतील.

मागील काही काळापासून चर्चेत असलेले Samsung Galaxy A25 आणि Samsung Galaxy A15 5G स्मार्टफोन नुकतेच ग्लोबली लाँच करण्यात आले आहेत. तर, आता अखेर कंपनी हे स्मार्टफोन्स भारतात आणत आहे. होय, Samsung Galaxy A25 आणि Samsung Galaxy A15 5G स्मार्टफोन्सच्या भारतीय लाँच डेटची पुष्टी झाली आहे. हे फोन्स अनेक अप्रतिम वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहेत. चला तर मग जाणून घेऊयात या Samsung फोनचे भारतीय लॉन्चिंग डिटेल्स-

Samsung Galaxy A25 आणि Galaxy A15 5G इंडिया लाँच

Samsung India ने आपल्या अधिकृत X (Twitter) हँडलद्वारे Samsung Galaxy A25 आणि Samsung Galaxy A15 5G स्मार्टफोन्सची भारतीय लाँच डेट कन्फर्म केली आहे. हे दोन्ही फोन 21 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 12:30 वाजता भारतात लाँच करण्यात येतील. केवळ लाँच डेटच नाही तर, कंपनीने आपल्या ट्विटमध्ये या दोन्ही स्मार्टफोन्सच्या डेडिकेटेड मायक्रोसाइटची लिंक शेअर केली आहे.

Samsung Galaxy A25 आणि Galaxy A15 5G

वर सांगितल्याप्रमाणे, हे दोन्ही स्मार्टफोन्स ग्लोबली लाँच करण्यात आले आहेत. ग्लोबल व्हेरिएंटनुसार पुढील स्पेसिफिकेशन्स दोन्ही फोनमध्ये मिळण्याची शक्यता आहे.

डिस्प्ले

Samsung Galaxy A25 आणि Galaxy A15 5G फोनमध्ये 6.5-इंच लांबीचा फुल HD + सुपर AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे.

samsung galaxy a25 5g

प्रोसेसर

Samsung Galaxy A25 फोन Exynos 1280 प्रोसेसरने सुसज्ज आहे, तर Galaxy A15 5G फोन MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसरसह येतो.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी, दोन्ही फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आहे. ज्यामध्ये 5MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2MP मॅक्रो सेन्सरचा समावेश आहे. तर, कंपनीने Samsung Galaxy A25 5G फोनमध्ये OIS सपोर्ट आणि 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. दोन्ही फोनमध्ये आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 13MP फ्रंट कॅमेरा आहे.

बॅटरी

दोन्ही फोनमध्ये बॅटरी 5000mAh ची आहे, ज्यामध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. या मोठ्या बॅटरीसह हा स्मार्टफोन वेब सर्फिंगसारख्या मूलभूत कार्यांसह दोन दिवस टिकण्याची क्षमता ठेवतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo