Samsung Galaxy A23 5G स्मार्टफोन Amazon वर मोठ्या सवलतींसह सादर केला जात आहे. कंपनीचा हा डिव्हाइस ऍडवान्सड फीचर्ससह येतो. त्यासोबतच, एक्सचेंज ऑफर आणि बँक ऑफरसह हँडसेट आणखी स्वस्तात खरेदी करता येईल. हा स्मार्टफोन जानेवारी 2023 मध्ये 22,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता. मात्र, आता जवळपास निम्म्या किमतीत खरेदी केला जाऊ शकतो.
Samsung Galaxy A23 5G Amazon वर 22,999 रुपयांना सूचिबद्ध आहे. तसेच, यावर काही डिस्काउंट ऑफर आहेत, ज्यानंतर फोनच्या किंमतीत काही प्रमाणात घट होईल. याशिवाय सॅमसंग गॅलेक्सी A23 5G वर बँक ऑफर देखील उपलब्ध आहेत. ज्यामध्ये SBI क्रेडिट कार्डवर रु. 2000 झटपट सूट मिळणार आहे. त्याप्रमाणे, HSBC कॅशबॅक कार्ड क्रेडिट कार्ड पेमेंटवर 5% म्हणजेच 250 रुपयांपर्यंत इन्स्टंट डिस्काउंट मिळेल.
याव्यतिरिक्त, Amazon डिव्हाइसवर 21,100 रुपयांपर्यंत एक्सचेंज सवलत देत आहे. जर तुमच्याकडे जुना स्मार्टफोन असेल तर तुम्ही तो अगदी स्वस्तात खरेदी करू शकता. डिवाइसची किंमत जवळपास बदलत राहण्याची शक्यता आहे.
फोनमध्ये 1080 x 2408 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.6-इंचाचा PLS LCD डिस्प्ले आहे. डिस्प्लेला 120Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. तसेच, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन देण्यात आले आहे. फोनमध्ये प्रोसेसर म्हणून Qualcomm Snapdragon 695 5G प्रोसेसर मिळेल. यासोबतच, 8GB RAM आणि 128GB स्टोरेज देखील मिळणार आहे. फोन Android 12 वर चालतो परंतु Android 13 वर अपग्रेड केला जाऊ शकतो.