Samsung Galaxy A23 5G चे फीचर्स लाँचपूर्वी लीक, हा फोन लवकरच भारतात होणार दाखल

Samsung Galaxy A23 5G चे फीचर्स लाँचपूर्वी लीक, हा फोन लवकरच भारतात होणार दाखल
HIGHLIGHTS

Samsung Galaxy A23 5G लवकरच भारतात लाँच होणार

हा फोन भारतात 18 जानेवारी रोजी सादर केला जाईल.

हा फोन 25,000 रुपयांच्या सेगमेंटमध्ये लाँच होईल.

Samsungचा नवीन फोन Samsung Galaxy A23 5G भारतात लाँच होण्याची पुष्टी झाली आहे. Samsung Galaxy A23 5G भारतात 18 जानेवारी रोजी सादर केला जाईल. याआधी फोनच्या किंमतीपासून ते सर्व फीचर्स लीक झाले आहेत. Samsung Galaxy A23 5G 25,000 रुपयांच्या सेगमेंटमध्ये लाँच केला जाईल.

हे सुद्धा वाचा : 84 दिवसांच्या वैधतेसह JIOचा सर्वात स्वस्त प्लॅन, किंमत फक्त 395 रुपये…

Samsung Galaxy A23 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

Samsung Galaxy A23 5G दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरियंटमध्ये बाजारात लाँच केला जाईल. Galaxy A23 5G ला 128 GB पर्यंत स्टोरेज मिळेल आणि चार रियर कॅमेरे मिळतील. यात 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी असेल. फोनमध्ये 6 GB रॅम आणि 128 GB पर्यंत स्टोरेज मिळेल. Samsung Galaxy A23 5G चा हा व्हेरिएंट 23,999 रुपये आणि 8 GB रॅम सह 128 GB स्टोरेज 25,999 रुपये किमतीत सादर केला जाईल.

Samsung Galaxy A23 5G ला Android 12 सह One UI 4.1 मिळेल. याशिवाय फोनमध्ये 6.6-इंच लांबीचा फुल HD + डिस्प्ले असेल. फोनमध्ये 8 GB पर्यंत रॅम आणि 128 GB पर्यंत स्टोरेज ऑक्टा-कोर प्रोसेसरसह मिळेल.

Galaxy A23 5G च्या कॅमेरासह OIS देखील उपलब्ध असेल. 50 मेगापिक्सलच्या प्राइमरी लेन्सशिवाय इतर तीन लेन्स 5 मेगापिक्सल, 2 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सल्सच्या असतील. सेल्फीसाठी यात 8 मेगापिक्सेल कॅमेरा मिळेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo