साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Samsung ने आपला नवा फोन Samsung Galaxy A16 5G भारतात लाँच झाला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, Galaxy A सिरीजच्या अनेक स्मार्टफोन्सना भारतीय बाजारात खूप पसंती मिळाली आहे. आता हा नवा स्मार्टफोन देखील बाजारात दाखल झाला आहे. गेल्या आठवड्यात हा स्मार्टफोन युरोपमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. चला तर मग जाणून घेऊयात Samsung Galaxy A16 5G ची किंमत आणि संपूर्ण तपशील-
Also Read: 500 रुपयांअंतर्गत Airtel चा बेस्ट प्लॅन! मिळतील 22 पेक्षा जास्त OTT प्लॅटफॉर्म्सचे सबस्क्रिप्शन Free
Samsung Galaxy A16 5G हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये भारतात लाँच करण्यात आला आहे. या फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8GB रॅम+ 128GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 18,999 रुपये आहे. तर, टॉप व्हेरिएंट 8GB आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 21,999 रुपये इतकी आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, Samsung Galaxy A16 5G फोन आजपासून Amazon, Flipkart आणि Samsung India च्या वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध आहे.
Samsung Galaxy A16 5G स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच लांबीचा फुल HD+ इन्फिनिटी-यू सुपर AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टिटास्किंगसाठी, या फोनमध्ये Octa Core MediaTek Dimensity 6300 6nm प्रोसेसर उपलब्ध आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, हा स्मार्टफोन 8GB रॅम आणि 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजसह येतो. मायक्रो SD कार्डच्या मदतीने ते 1.5TB पर्यंत वाढवता येईल. सुरक्षिततेसाठी, या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. तर, पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी यात IP54 रेटिंग उपलब्ध आहे.
फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy A16 5G फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 5MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 2MP मॅक्रो सेन्सर उपलब्ध आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या समोर 13MP फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झल्यास, या फोनमध्ये 5G, Dual 4G VoLTE, ब्लूटूथ 5.3, GPS + GLONASS, USB Type-C पोर्ट, NFC इ. चा समावेश आहे.