digit zero1 awards

Samsung Galaxy A15 5G चे फीचर्स लाँचपूर्वीच Leak, नवीन स्मार्टफोन Affordable किमतीत होणार सादर?  

Samsung Galaxy A15 5G चे फीचर्स लाँचपूर्वीच Leak, नवीन स्मार्टफोन Affordable किमतीत होणार सादर?  
HIGHLIGHTS

Samsung Galaxy A15 5G भारतात लवकरच लाँच होणार

हा स्मार्टफोन बजेट श्रेणीमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.

हा फोन Galaxy A14 चा सक्सेसर म्हणून सादर करण्यात येणार आहे.

Samsung Galaxy A05s नंतर आता कंपनी आणखी एक नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनी नवीन A-सिरीज मॉडेल लाँच करणार आहे. कंपनी Galaxy A15 5G वर काम करत आहे. हा फोन Galaxy A14 चा सक्सेसर म्हणून लाँच करण्यात येणार आहे. लॉन्च होण्यापूर्वीच Galaxy A15 चे काही स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत.

हे सुद्धा वाचा: Upcoming Smartphone November 2023: हे जबरदस्त फोन पुढील महिन्यात लाँच होण्यास सज्ज, संपूर्ण यादी पहा

Samsung Galaxy A15 5G ची अपेक्षित किंमत

लीक्सनुसार, Samsung Galaxy A15 5G ची किंमत $149 म्हणजेच जवळपास 12,400 रुपये असण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत हा फोन बजेट रेंजमध्ये सादर केला जाईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, Samsung Galaxy A14 5G ची किंमत 16,499 रुपये आहे. ही त्याच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत आहे. तर, 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 18,999 रुपये आहे. त्याच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 20,999 रुपये आहे.

Samsung Galaxy A15 5G Price leak
Samsung Galaxy A15 5G Price leak

Samsung Galaxy A15 5G

Samsung Galaxy A15 5G मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.5 इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. या फोनमध्ये MediaTek Dimension 6100+ चिपसेट दिला जाऊ शकतो. फोनला 4GB रॅम आणि 6GB रॅम व्हेरिएंट दिले जातील. यासोबतच, 128GB इंटरनल स्टोरेज दिले जाईल. हे मायक्रो SD कार्डद्वारे वाढवता येते. हा फोन Android 13 वर आधारित One UI कस्टम स्किनवर काम करतो.

त्याबरोबरच, या फोनमध्ये 50 MP चा प्राइमरी रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. तर आणखी 5MP चा अल्ट्रा-वाइड-एंगल सेन्सर असू शकतो. तसेच, 2MP चा डेप्थ सेन्सर दिला जाऊ शकतो. आकर्षक सेल्फीसाठी फ्रंटमध्ये 13MP चा सेल्फी कॅमेरा असण्याची अपेक्षा आहे. फोनमध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी दिली जाऊ शकते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo